राजुरा : झाडीबोली साहित्य ग्रामीण विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात कवी सुनील पोटे यांच्या आंबील काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संत नगाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे होते. उद्घाटक म्हणून समाज कल्याण उपायुक्त विजय वाकुलकर यांच्यासह कवी अरूण झगडकर, कवी प्रशांत भंडारे, ॲड. लख्खनसिंह कटरे, परशुराम खुणे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, श्यामराव पोटे, कुंदा पोटे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक कवी सुनील पोटे यांनी केले.
यावेळी त्यांनी काव्यसंग्रहाची निर्मितीबाबतची प्रेरणा, झाडीबोलीबाबत असलेली आस्था व ती टिकविण्याची आवश्यकता याबाबत प्रकाश टाकला. संचालन रामकृष्ण चनकापुरे, आभार अर्चना जुनघरे- पोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. अनिल पोटे, रामकृष्ण मांडवकर, प्रा. गणेश लोहे, विनोद ढोबे, रामरतन चाफले यांनी परिश्रम घेतले.