धाबा : महाराष्ट्र व तेलंगणाचे आराध्य दैवत संत परमन्स कोंडय्या महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकमत पुरवणी प्रकाशन सोहळा पार पडला.
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून संस्थान व गावकरीतर्फ़े दोन दिवस जयंती यात्रा भरविण्यात आली व त्यानिमित्त महाराजांची पालखी काढण्यात आली. महाराज हयात असताना त्यांना अभिप्रेत असलेल्या अग्निकुंड प्रभावडीचा कार्यक्रम तुलसीदास शेगमवार महाराज व जंगम पुरोहित यांच्याद्वारे परंपरेनुसार छोटेखानी करण्यात आला व यात्रेची सांगता लक्ष्मणदास काळे महाराज अमरावती यांच्या गोपाळकाला कीर्तनाने झाली. ‘लोकमत’ने कोंडय्या महाराज चरित्र पुरवणी तयार केली. याचा प्रकाशन सोहळा घेण्यात आला. यावेळी काळे महाराज, संस्थान अध्यक्ष अमर बोडलावर, उपाध्यक्ष बाबूराव बोमकंठीवार, सचिव किशोर अगस्ती, कोषाध्यक्ष स्वप्निल अमुलवार, बबनराव पत्तीवार, अनिल काटकर व वेदांत मेहरकुळे, दिलीप बचूवार, नीलेश झाडे उपस्थित होते.