लोकमत न्यूज नेटवर्कमूल : लोकमत समुहाच्या वतीने ‘लोकमत दालन विकासाचे २०१७’ या पुरवणीचे प्रकाशन राज्याचे लोकायुक्त तथा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘मूल भूषण गौरव’ सोहळ्यात सदर पुरवणीचे प्रकाशन स्व. मा. सा. कन्नमार सभागृहात पार पडले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, शहर प्रतिनिधी भोजराज गोवर्धन, मारोडाचे वार्ताहर गंगाधर कुनघाडकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सदर पुरवणी मूल तालुक्याच्या विकासाला चालना देणारी असल्याचे मत व्यक्त केले. दालन विकासाचे या पुरवणीने मूल शहर व तालुक्यातील घटनांना उजाळा देण्याचे काम केले असून राजकीयदृष्ट्या संवेदनशील व राजकीय वारसा लाभलेली भूमी असल्याने मूलचे महत्त्व विशेष आहे, असे मत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. सदर पुरवणी भविष्यातील वेध घेणारी ठरणार असून यासाठी तालुका, शहर व ग्रामीण वार्ताहरांनी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.
मूल येथे लोकमत विकासाचे दालन पुरवणीचे प्रकाशन
By admin | Published: June 26, 2017 12:36 AM