चंद्रपूर : वन विकास महामंडळाव्दारे उत्कृष्ठपणे केलेल्या सी.एन.आर.अंतर्गत टर्न की रोपवनाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालय करण्यात आले. वन विकास महामंडळ वनिकरण कामे करण्यात अत्यंत तरबेज असून महाराष्ट्रातील प्रमुख कंपन्यांनी पर्यावरणाच्या समृध्दीसाठी पुढे यावे व वन विकास महामंडळाच्या टर्न की अंतर्गत करण्यात येणाऱ्या रोपवन योजनेव्दारे कंपनीच्या व खासगी जागेत किफायतशिर दरात रोपवने करून घ्यावीत, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत, मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन ) जी.आर.के.राव, महाव्यवस्थापक (दक्षिण) एम.एम.गुल्ली, महाव्यवस्थापक (उत्तर) एस.एस.डोळे, विभागीय व्यवस्थापक मध्ये चांदा एम.एस.फारुखी, विभागीय व्यवस्थापक ब्रम्हपूरी पी.एस.राजपुत, विभागीय व्यवस्थापक मार्खन्डा पी.आर.धावडा, विभागीय व्यवस्थपक आगार विभाग पी.जी.नौकरकर, विभागीय व्यवस्थापक पश्चिम चांदा एस.बी.पाटील, व्ही.एन.शेलार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुनगंटीवार यांच्या हस्ते टर्न की रोपवन पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Published: January 08, 2016 1:52 AM