लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात उमटले. विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. चंद्रपूर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वतीने शनिवारी दहशतवादी हाफिज सईदच्या प्रतिकात्मतक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याशिवाय मनसेनेही प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घटनेबाबत संताप व्यक्त केला.यावेळी अभाविपचे नगरमंत्री स्नेहीत लांजेवार, सहमंत्री यश बांगडे, सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख प्रवीण गिलबिले, मनीष पीपरे, प्रज्वल गार्गेलवर, सागर येळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ओंकार अंदनकर, राहुल भोयर, वैभव बललेवार, अनंत भाकरे, राहुल ताकधत, साकेत सोनकुसरे व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. स्टुडन्ट फोरम ग्रुपतर्फे राजीव गांधी चौक ते बस स्थानकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. मनसेनेही भ्याड हल्ल्याचा निषेध करीत दहशतवाद्यांचा पुतळ्याचे दहन केले व पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनिता गायकवाड, प्रकाश नागरकर, विवेक धोटे, प्रतिमा ठाकूर आदी उपस्थित होते. वीरगती प्राप्त झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चंद्रपूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक संघटनांनी कॅन्डल मार्च काढला.इको-प्रोची रक्तस्वाक्षरी मोहीमपुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इको-प्रो संघटनेच्या वतीने अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात एक निवेदन तयार करून त्यावर नागरिक, कार्यकर्त्यांच्या रक्ताने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे रक्तस्वाक्षरीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे.सोमवारी बाजारपेठ बंदचेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी संघटनांतर्फे भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी गांधी चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात येणार असून सोमवारी व्यापारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी यांनी सांगितले.
पुलवामा घटनेचे जिल्ह्यात पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:03 PM
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात उमटले. विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
ठळक मुद्देठिकठिकाणी कॅन्डल मार्च : हाफिज सईदच्या पुतळ्याचे दहन