चंद्रपूर : कोरोना नियंत्रणासाठी ताडाळी येथील ग्राम पंचायतीतर्फे गावात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी सरपंच संगीता पारखी, उपसरपंच निकिलेश चामरे यांच्या नेतृत्वात चक्क ग्राम पंचायत सदस्य संजोग अडबाले व अशोक मडावी यांनी पाठीवर पंप घेऊन गावात फवारणी केली. या उपक्रमामुळे ग्राम पंचायतीतर्फे राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. आता रुग्णसंख्या कमी होत असली तरीही पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन ताडाळी ग्राम पंचायतीतर्फे संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यासाठी काही कामगार नेमले आहेत. परंतु, त्यांच्यासोबतच ग्राम पंचायत सदस्यांनी स्वत: पंप घेऊन गावात फवारणी केली. कृणाल दिवसे, राहुल खांडरकर, नितेश नागरकर, दीपक निखाडे, शुभम चौधरी, श्रावण जाणवे या कोविड योद्ध्यांनीसुद्धा या उपक्रमास हातभार लावला.