शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
5
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
6
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
7
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
8
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
10
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
11
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
12
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
13
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
14
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
15
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
16
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
17
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
18
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
19
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
20
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली

बुलेट मिरवणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांवर थेट न्यायालयात खटला; ३५ वाहचालकांवर दंड

By परिमल डोहणे | Published: November 01, 2023 5:26 PM

आरटीओ व वाहतूक शाखेची कारवाई

चंद्रपूर : वाढत्या अपघाताला आळा घालण्याच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी ४१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये अठरा वर्षाखालील सहा अल्पवयीन बुलेट चालकांवर न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला, तर विना परवाना, विना हेल्मेट ३५ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे दाबे दणाणले आहेत.

दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अल्पवयीन चालकाच्या हातातही सर्रास वाहने दिसून येत आहेत. परिणामी, अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक शाखेच्या वतीने अल्पवयीन वाहनचालक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली असून चौका-चौकात पथक गठित केले आहे. या पथकांकडून चालकांची तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी या पथकाने सहा अल्पवयीन बुलेटराजांवर कारवाई करत त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल केला, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या नेतृत्वात आरटीओतील तसेच वाहतूक पोलिसांच्या पथकाने केली.

आरटीओने घेतला क्लास

मंगळवारी ४१ वाहनचालकांवर केलेल्या कारवाईत सहा अल्पवयीन वाहनचालकांचा समावेश आहे. त्यामुळे आरटीओने नियमांचे उल्लंघन केलेल्या सर्व चालकांना पालकांना बोलावून त्यांचा क्लास घेतला. यावेळी अल्पवयीन चालकांच्या हातात गाड्या देण्याचे दुष्परिणाम तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अपघाताची शक्यता याबाबत समुपदेशन केले.

स्टंटमॅन राहणार रडारवर

शहरातील अनेक भागात दुचाकी वाहनचालक मोठ्या प्रमाणात स्टंट करत असतात. परिणामी, त्यांच्यासह इतरांच्या जीविताला धोका असतो. त्यामुळे अशा स्टंटमॅनविरुद्धही या संयुक्त पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सायंकाळी तसेच रात्री हे पथक ग्रस्त घालून कारवाई करणार आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRto officeआरटीओ ऑफीसbikeबाईक