शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

नऊ सोसायटयांकडून २४ हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 5:00 AM

नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात असा आजवरचा अनुभव आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून शासनाने मागील वर्षीप्रमाणेच तालुक्यातील नऊ आदिवासी सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. प्रत्यक्षात ही धान खरेदी ३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.आदिवासी विकास महामंडळाचे  हमीभाव १८८८ व १८३५ रुपये आहेत. धान विक्रीवर बोनसही दिला जातो.

ठळक मुद्देसोसायटयांचीही धान खरेदी जोरात

  घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : आदिवासी सोसायट्यांमध्येही धानास योग्य भाव मिळत असल्याने सोसायटयांचीही धान खरेदी जोरात सुरू आहे. नागभीड तालुक्यात नऊ आदिवासी सोसाट्यांमार्फत धान खरेदी सुरू आहे. १९ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार नऊ सोसायटयांनी २४ हजार ५३०  क्विंटल धान खरेदी केली आहे.नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात असा आजवरचा अनुभव आहे.आदिवासी विकास महामंडळाकडून शासनाने मागील वर्षीप्रमाणेच तालुक्यातील नऊ आदिवासी सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. प्रत्यक्षात ही धान खरेदी ३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.आदिवासी विकास महामंडळाचे  हमीभाव १८८८ व १८३५ रुपये आहेत. धान विक्रीवर बोनसही दिला जातो. मात्र यावर्षी या बोनससंदर्भात अद्याप सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती संबंधित सुत्रांनी दिली. मिळत असलेले योग्य दर लक्षात घेऊन शेतकºयांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्यांकडे वळविला आहे.परिणामी मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायट्यांसमोर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले धान ठेवण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.टोकन पद्धतीचा अवलंब आदिवासी विकास महामंडळाने कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन टोकण पद्धती सुरू केली आहे. सोसायट्यांनी किंवा आदिवासी विकास महामंडळानेअगोदर केलेल्या आवाहनानुसार शेतकºयांनी धान विक्रीची नोंदणी करून घेतली आहे. ज्या शेतकºयाचा नंबर असेल त्या शेतकºयास सूचना देऊन बोलाविण्यात येते आणि काटा करण्यात येतो. त्यामुळे गर्दी होत नसल्याची माहिती आहे. 

अशी आहे सोसायट्यांची धान खरेदी आदिवासी विकास महामंडळाने ज्या सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत त्यात नवखळा सोसायटीने १४२१.२७ क्विंटल, चिंधी चक सोसायटीने ४३०५.८८ क्विंटल, गोविंदपूर २१७५.०९ क्विंटल, कोजबी (माल) सोसायटीने २७६०.९९  क्विंटल, गिरगाव सोसायटीने २१६१.१२ क्विंटल, सावरगाव सोसायटीने ५१५७.३७ क्विंटल, जीवनापूर सोसायटीने १६१०.९७ क्विंटल, बाळापूर सोसायटीने २८०३.८६ क्विंटल आणि वाढोणा सोसायटीने २१३३.८८ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. याशिवाय पणन महासंघातर्फे नागभीड येथील खरेदी विक्री संघा व कोर्धा येथील श्री गुरूदेव राईस मील येथेही धान खरेदी सुरू आहे. मात्र या ठिकाणी धानाची किती  खरेदी झाली याचा तपशिल मिळू शकला नाही .

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड