खरीप हंगाम : जिल्हा कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांचे आवाहनचंद्रपूर : शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते पीक संरक्षण, औषधी या निविष्ठा सर्व अधिकृत कृषी निविष्ठा विक्री केंद्रात उलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत निविष्ठा विक्री केंद्रातूनच संबंधित मालाची खरेदी करुन पावती घ्यावी व ती जपून ठेवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी केले आहे.खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी निवष्ठा केंद्रातून घेतलेल्या पावतीवर दर, किंमत, लॉट व बॅच क्रमांक, वाणाचे नाव, उत्पादक कंपनीचे नाव, पावतीची तारख असल्याची खात्री तत्काळ करुन घ्यावी, कोणत्याही ठिकाणी ज्यादा दराने आकारणी होत असल्यास कृषी विभागाला कळविण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. खरेदी केलेल्या बियाण्यांची पिशवी, पॉकेट व लेबल आणि त्यातील थोडे बियाणे जपून ठेवावे. घरचे बियाणे वापरावयाचे झाले असल्यास त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. बियाणे व खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी अत्यंत जागृत राहणे आवश्यक आहे. अशी कुठलीही बाब निदशर्शनास आल्यास कृषी विभागाच्या तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय कार्यालयात ०७१७२-२७१०३४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.बीटी कापूस बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात कायदा करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त कंपन्याचे बियाणे अधिकृत बिल घेऊनच खरेदी करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी) सोयाबीन बियाणे काळजीपूर्वक हाताळावेसोयाबीन पिकाचे बियाणे काळजीपूर्वक हाताळावे. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय आणि तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंतच या बियाण्यांची पेरणी करावी. अनाधिकृत बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांनी वापरु नये. याबाबत कुठलीही हमी नसल्यामुळे भविष्यात कार्यवाही करण्यास अडचणी निर्माण होतात.
अधिकृत निविष्ठा केंद्रातूनच बियाणे - खत खरेदी करावे
By admin | Published: April 24, 2017 1:07 AM