लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : परिस्थीतीचा सामना करत उपलब्ध असेल त्या सोयीसुविधेत अभ्यास करून प्राविण्यासह दहावी व बारावीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही सर्वासाठी गैरवास्पद बाब आहे. आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होत आहे. त्या विद्यार्थ्यामधून समाज व राष्ट्रसेवेला समर्पित युवा घडतील, असा विश्वास सर्वांना आहे. त्यामुळे निश्चित ध्येय बाळगून ध्येय साकारण्यासाठी यशाचा पाठलाग करावा, असे आवाहन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गडचांदूर येथील बालाजी सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, जि.प. सभापती गोदावरी केंद्रे, जिवती पं. स. उपसभापती महेश देवकते, जिवती नगराध्यक्षा पुष्पा नैताम तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, केशव गिरमाजी, महामंत्री नत्थुजी ढवस, मनोहर कुळसंगे, सुरेश केंद्रे, सतीश धोटे, संजय मुसळे, राजू घरोटे, सतीश उपलेंचवार, महादेव एकरे, रोहन काकडे आदी उपस्थित होते.अंत्यंत गरिबी असताना अविश्रांत परिश्रमाला सातत्याची जोड देत या देशातील अनेक महापुरूषांनी विविध क्षेत्रामध्ये महानत्व सिध्द केले आहे. आपल्या कर्तुत्वातून त्यांनी आजवरच्या अनेक पिढ्यांसमोर आदर्श ठेवला असून त्यांच्या या कार्यकर्तृत्वातून प्रेरणा घेत या देशाच्या अनेक पिढ्या पोसल्या आहेत. आजही या महापुरूषांच्या कार्याला दीपस्तंभ मानत नवपीढी शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. हे अभिनंदनीय आहे असा गौरवोद्गार माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला. प्रास्ताविक नारायण हिवरकर, संचालन सतिश उपलेंचवार तर आभार रोहणकाकडे यांनी केले.सातत्यपूर्ण अभ्यासातून यशप्राप्ती- धोटेअभ्यास व स्वप्नात सातत्य ठेवून सातत्यपूर्ण अभ्यास केला यशप्राप्ती होते. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करावे, शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनांचा लाभ घेऊन यशाचे शिखर गाठा, असा विश्वास आ. धोटे यांनी व्यक्त केला. यावेळी खुशाल बोंडे, महेश देवकते यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे गुणगौरव करीत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवान्वीत करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी नगरसेवक अमर राठोड, गोंविद टोकरे, गोपिनाथ चव्हाण, दत्ता राठोड, हितेश चव्हाण, पुरूषोत्तम निब्रड यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.निवेदिता महिलातर्फे गुणवंतांचा सत्कारनवरगाव : निवेदिता महिला क्रेडीट को-आॅप- सोसायटी नवरगावच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गजानन कोर्तलवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. श्रीनिवास पिलगुलवार, संस्थाध्यक्ष सुनंदा बाकरे आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र,ट्रॉफी देउन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक संस्थाध्यक्ष सुनंदा बाकरे, संचालन गणेश चन्नेवार तर आभार प्रज्ञा कवासे यांनी मानले.
ध्येय बाळगून ध्येयपूर्तीसाठी यशाचा पाठलाग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:44 AM
परिस्थीतीचा सामना करत उपलब्ध असेल त्या सोयीसुविधेत अभ्यास करून प्राविण्यासह दहावी व बारावीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही सर्वासाठी गैरवास्पद बाब आहे. आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होत आहे. त्या विद्यार्थ्यामधून समाज व राष्ट्रसेवेला समर्पित युवा घडतील, असा विश्वास सर्वांना आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर - गडचांदूर येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ