शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
2
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
3
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
4
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
5
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
6
शेअर्स मार्केटची घोडदौड सुरुच! Axis, ICICI यासह 'या' शेअर्समध्ये आज उसळी; कोणते शेअर्स पडले?
7
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
9
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
10
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
11
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
12
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
13
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
14
सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार
15
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?
16
कोट्यवधींच्या मालक आहेत राधिका गुप्ता, तरीही लक्झरी कार नकोय; कारण ऐकून अवाक् व्हाल 
17
"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान
18
Rupali Ganguly : "माझ्या मुलाचा जन्म हा चमत्कार..."; अभिनेत्रीला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधीच होणार नाही आई
19
"मी चूक मान्य करतो पण तिला..."; बंगळुरुमधील 'त्या' ऑटो चालकाने सांगितली दुसरी बाजू
20
दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्रीच नाही तर दोन मंत्रीही मिळणार; केजरीवालांच्या घरी बैठक सुरु

धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्यापूर्वी खड्डे बुजवा

By admin | Published: October 06, 2015 1:21 AM

वरोरा नाका चौक ते दीक्षाभूमीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या

चंद्रपूर : वरोरा नाका चौक ते दीक्षाभूमीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. येत्या १४ आॅक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्मचक्र अनुवर्तन दिनाचा समारंभ येथील दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे. खड्डयामुळे लाखो आंबेडकरी अनुयायांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. १४ आॅक्टोबरपूर्वी या रस्त्यावरील खड्डयांची तातडीने डागडुजी करावी. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शशिकांत देशकर यांनी दिला. यासंदर्भातील निवेदन शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.देशकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकातील काम गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. पूर्वीच्या कामाचे डिझाईन चुकले. नविन उड्डाण पुलाचीही तिच स्थिती झाली. अर्धेअधीक काम झाल्यानंतर डिझाईन चुकल्याच्या नावाखाली बांधकाम विभागाने काम बंद केले. शिवाय रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे. यापूर्वी जवळपास ५० लोकांना वरोरा नाका चौकात जीव गमवावा लागला. आणखी किती लोकांचा जीव गेल्यानंतर कामाला प्रारंभ करणार आहात, असा सवाल देशकर यांनी उपस्थित केला आहे.यापूर्वी कार्यकारी अभियंत्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत पुल सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कामाला प्रारंभ झाला नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व आंबेडकर महाविद्यालयासमोरील मित्रनगर चौकापर्यंतच्या रस्त्यांची कामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तेही हवेतच विरले. आता धम्मचक्र अनुवर्तन दिन लवकरच सुरू होणार आहे. मात्र काम सुरू झाले नाही. चार दिवसांत या मार्गावरील खड्डे बुजवावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देशकर यांनी दिला. निवेदन देताना नगरसेवक संजय वैद्य, सुनिल काळे, महेंद्र लोखंडे, राजेंद्र नागरकर, मुन्ना भाई, शबीरभाई, राजेंद्र माकोडे, नयन महातव, प्रशांत चिप्पावार, प्रतिक भगत, विजय नागापुरे, सुनिल धोत्रे, मुन्ना तावाडे, प्रियदर्शन इंगळे, राजेंद्र आखरे, निमेश मानकर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)