सिंदेवाही तालुक्यात मुख्य पीक धानाचे घेतले जात असून अलिकडे पाण्याच्या सोयींमुळे धानाच्या उत्पादनात वाढ होत आहे. परंतु उत्पादन खर्च वाढत असल्याने व धानाला पुरेसा भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत असून निराशा वाढत असल्याचे चित्र आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्वत्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत.
याचाच भाग म्हणून सेवा सहकारी संस्था मर्यादित रत्नापूर येथे खरीप धान खरेदी हंगाम २०२१ करिता ऑनलाईन नोंदणीची सोमवारी सकाळी १० वाजतापासून सुरुवात होणार होती. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी आपले धान खरेदीसाठी लवकर नंबर लागावा, म्हणून सकाळी ७.३० पासूनच लाईन लावली. गर्दी वाढतच गेल्याने शेवटी धक्काबुक्की झाली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
210921\img-20210920-wa0002.jpg
आधारभुत धान खरेदी नोंदणीसाठी नागरीकांनी अशी गर्दी केली होती