लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील बहुउद्देशीय गुरव समाज समितीच्या वतीने गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, गुरव समाजाच्या अध्यक्ष मंजुषा फुलझेले, उपाध्यक्ष नंदकिशोर बोमनवार, सहसचिव सचिन सुरेश क्षीरसागर, तांबसकर, क्षमा महाकाले, माया घायवनकर व समितीचे सदस्य उपस्थित होते.सर्व ट्रस्टमध्ये गुरव समाजाला ५० टक्के विश्वस्त व पदाधिकारी म्हणून घ्यावे, ज्यांनी वयाच्या ६० वर्षांपर्यंत मंदिरात देवाची पूजा केली आहे, त्यांना उदरनिर्वाहासाठी निवृत्ती वेतन द्यावे, मंदिर अधिग्रहण कायदा न करणे, शेतीविषयक कर्ज पुरवठा सवलती उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचा त्यांच्या निवेदनात समावेश आहे. यावेळी चंद्रपुरातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
गुरव समाजाचे चंद्रपुरात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:13 PM