कोरपना येथुन नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वरोरा, चिमूर, घुग्घुस, वणी शहर गाठण्यांसाठी कमी अंतराचा व वेळेची बचत करणारा हा मार्ग आहे. शिवाय वणी ते चारगाव चौकी रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. तेव्हा कोरपना ते चारगावपर्यंत चौपादरीकरण केल्यास हा मार्ग वाहतुकीसाठी सुलभ होईल. कोरपना, जिवती, राजुरा भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी सोईचा होऊन व्यापारिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. रस्त्याची अवस्था ही अतिशय दयनीय झाल्याने वाहतूकदार व प्रवासी नागरिकांना प्रचंड त्रास संभवत आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येतही वाढ झाली असून अनेकांचे जीव गेले, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
त्यामुळे सदर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी होत आहे.