अभियंत्याची गैरहजेरी : कंत्राटदारास रान मोकळे
गोंडपिपरी : स्थानिक नगरपंचायतअंतर्गत नुकतेच करण्यात आलेले विविध प्रभागातील नाली बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाहीची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनस्तरावरून येथील नगरपंचायतीला निधी प्राप्त झाला. या निधीअंतर्गत शहरातील विविध भागांच्या आवश्यकतेनुसार नाली बांधकामाची अंदाजपत्रके तयार करून ई-निविदा काढण्यात आल्या. सध्या नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. या निविदांची जबाबदारी ही मुख्याधिकाऱ्यांकडे होती. अशातच मुख्याधिकाऱ्यांनी ई-निविदेत शहरातील व बाहेरील कंत्राटदाराचा ताळमेळ जुळवत अधिकाधिक कामे एका जवळच्या कंत्राटदाराला दिल्याची ओरड आहे. शहरात ८० लाखांहून अधिक रुपयांच्या विकासकामांना टाळेबंदी काळात सुरुवात केली. सदर कामावर देखरेखीची परिपूर्ण जबाबदारी शाखा अभियंता अनुप भगत यांच्याकडे असताना त्यांच्या गैरहजेरीत कामे झाली. या कामाचा दर्जा सुमार असल्याची ओरड सुरू झाली आहे. नफाखोरीसाठी थातूरमातूर कामे केल्याचे बोलले जात आहे. या कामांची रितसर चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
===Photopath===
010621\img_20210531_163003.jpg
===Caption===
शहरातील जुना बस स्थानक परिसरातील हनुमान मंदिर ते जनता शाळे पर्यंतचे नाली बांधकाम