लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर, दुर्गापूर व ऊर्जानगर ग्रामपंचायत क्षेत्रात २६ जुलैपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ३ पर्यंत उघडण्यात आली होती. शहरात महानगर पालिकेने मंगळवारी १५७ अॅन्टिजेन चाचण्या पूर्ण केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मूल येथे क्वारंन्टाइन व कोविड केअरची क्षमता वाढविण्यात येणार आहे, अशी माहितीजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. मूल तालुक्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर शहर व परिसरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाची साखळी तोडणे व रूग्ण संख्या कमी करण्यासाठी सध्या ब्रह्मपुरी, भद्रावती, चिमूर शहरापाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्येच्या चंद्र्रपूर शहरात लॉकडाऊन सुरू आहे. २ मे नंतर ८८ दिवसानंतर बाधितांची संख्या दुप्पट झाली होती. मात्र नंतरच्या कालावधीत केवळ १०५ दिवसात २६१ बाधित पुढे आले आहे. जिल्ह्यात बाधितांची साखळी तोडली नाही रूग्ण संख्या वाढू शकते. अशावेळी आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे चंद्रपूर शहरात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी दिली. तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षाची पाहणी करून आरोग्य विभागाला सूचना दिल्या.३२ लाख २७ हजारांचा दंड वसूलकोरोना काळात प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांकडून मंगळवारपर्यंत ७ हजार १७४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत ५८ जणांना अटक करण्यात आली. १ हजार १७८ वाहने जप्त करून ४६९ जणांवर गुन्हे दाखल झाले. एकूण ३२ लाख २७ हजार ५७४ रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती जिल्हा प्रशासनान ेदिली.घरोघरी होणार आरोग्य तपासणीमूल तालुक्यात बिहारमधून आलेल्या २४ राईस मिल कामगार पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढू नये, यासाठी घरोघरी तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. जानाळा येथील लग्न प्रसंगातून कोरोनाची लागण झाली होती. अशा पद्धतीचे कोणतेही मोठे कार्यक्रम परिसरात होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी प्रशासनाला दिल्या.
क्वारंटाईन, कोविड केअरची क्षमता वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 5:00 AM
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. मूल तालुक्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर शहर व परिसरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे.
ठळक मुद्देकुणाल खेमनार : मूल तालुक्यातील उपाय योजनांचा आढावा