आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ‘ऐसा राज चाहू मै, जहॉ सबको मिले अन्न, छोटा बडो सबसम बैठे, रविदास रहे प्रसन्न’ अशी व्यापक मानवतावादी भूमिका घेऊन चर्मकार समाजातील संत रविदासांनी भारतीय मध्ययुगीन कालखंडात जाती आणि धर्मभेदाच्या भिंती उदध्वस्त केल्या़ या परिवर्तननिष्ठ विचारांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते चर्मकार बांधवांमध्ये जागृतीचे कार्य करीत आहेत़ परंतु, अजूनही समस्यांची गुंतागुंत सुटली नाही़ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात हा समुदाय उपेक्षित असल्याची खंत कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे़ सामाजिक अस्मिता लपवून कुठलाही समाज चिरंतन राहू शकत नाही़ वर्तमानातील अस्वस्थ प्रश्नांवर मात करून स्वाभिमानाने जगायचे असेल, तर व्यापक भान जोपासणाºया नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, असे मत ‘लोकमत’ व्यासपिठातील चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले़‘चर्मकार समाज दशा आणि दिशा’ विषयावरील चर्चासत्रात महाराष्ट्र चर्मकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास नवले, संत रविदास पंच मंडळाचे (पंचशील चौक) कार्तिक लांडगे, चर्मकार युवा समाज संघटनेचे अध्यक्ष विप्लव लांडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मा़ लांडगे आदी उपस्थित होते़देविदास नवले म्हणाले, चर्मकार समाज आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे घटनात्मक हक्क मिळाले़ परंतु, समाज जागृत झाल्याशिवाय या तरतुदींचा काही लाभ मिळणार नाही़, हे वास्तव आहे़ त्यासाठीच लोकशाही मार्गाने संघटना उभारून प्रबोधनाचे कार्य सुरू करण्यात आले़ चर्मकार समाजात सुमारे २१ पोटजाती आहेत़ या सर्व पोटजाती अनुसूचित जमाती प्रवर्गात येतात़ शिक्षण व सामाजिक जाणिवेचा अभाव असल्याने या जातींमध्ये रोटीबेटी व्यवहार बंद होते़ अलिकडे शिक्षणाचे प्रमाण वाढले़ परंपरेचा व्यवसाय सोडून उदरनिर्वाहाचे अन्य साधन स्वीकारावे लागले़ त्यामुळे जातींमधील दुरावा आता कमी झाला आहे़ प्रबोधनातूनच हे परिवर्तन घडू शकले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़ विप्लव लांडगे म्हणाले, भारतीय समाज व्यवस्थेने चर्मकार समाजाच्या वाट्याला सन्मान दिला नाही़ जाती व्यवस्थेच्या आधारावर व्यवसायाची जबाबदारी ढकलून समाजातील आदराचे स्थान नाकारल्याचा इतिहास सर्वांसमोर आहे़ या व्यवस्थेविरुद्ध संत रविदास, संत कबीर, संत चोखामेळा आदींनी विद्रोह केला़ माणुसकीचे मूल्य स्थापित केले़ त्यामुळे भूतकाळ न विसरता वर्तमानातील प्रगतीचा विचार करण्यासाठी संघटनात्मक कार्य सुरू केले़ युवक व युवतींमध्ये बदल होत आहेत़ या बदलाचा वेग वाढला पाहिजे, या हेतूने अधिक कार्य करण्याची गरज आहे़भारतीय संविधानात अनेक तरतुदी केल्या आहेत. मात्र राज्यकर्त्यांकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे हा समाज विकासापासून वंचित राहिला. आरक्षणाचे तत्व केवळ कागदावरच शिल्लक राहिले असून नोकºया संपुष्टात आल्या. बदलत्या आर्थिक व्यवस्थेमध्ये चर्मकार समाजाला सामावून घेणे कठीण जात आहे. यावर मात करायचे असेल तर युवक- युवतींनी सामाजिक हितासाठी एकत्र आले पाहिजे. मी स्वत: सामाजिक कार्यासोबतच स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे़ अन्य विद्यार्थ्यांनीही आता हा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे मत लांडगे यांनी मांडले.याशिवाय, शिक्षण व उद्योग क्षेत्रात चर्मकार समाजाची कशी अडचण होत आहे, याविषयी खंत मांडली. समाजाच्या हितासाठी वधू-वर परिचय मेळावा, जागृती शिबिर, विद्यार्र्थींची शिष्यवृत्ती, नवे व्यवसाय, आदी प्रश्नांबाबत जागृती सुरु असल्याचे सांगितले विकासासाठी सर्वानी एकत्र येवून लहान-लहान उपक्रमांपासून कार्य सुरू करणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मा. लांडगे यांनी आर्थिक, शैक्षणिक, बेरोजगारी विचार व्यक्त करताना म्हणाले, शासनाकडून व्यवसायिक मार्गदर्शन, आर्थिक व्यवस्थापनाविषयी पाठपुरावा होत नाही. त्यामुळे समस्या वाढल्या. चर्मकार समाजातील ७० टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. राजकीय क्षेत्रात या समाजाला वाव मिळाला नाही. राजकारणात येण्याची अनेकांची इच्छा असूनही आधार मिळत नाही. परिणामी, समाजाच्या प्रश्नांना वाचा फूटत नाही. समाजाला अस्वस्थ करणारे प्रश्न जैसे-थे असल्याने युवा पिढीमध्ये न्यूनगंड होण्याचा धोका आहे.राजकीयदृष्ट्या चर्मकार समाजाला वापरुन घेण्याची मानसिकता बंद व्हायची असेल तर संघटीत होणे हाच पर्याय आहे. बेरोजगारीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना लांडगे म्हणाले, चर्मकार समाजाचा मूळ व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर, व्यवसायिक शिक्षणाचा अभाव आणि मुख्य चप्पल बाजारपेठावर अन्य समाजातील मोठ्या व्यापाºयांनी कब्जा केला. त्यामुळे चर्मकार समाजातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस दुर्बल होत आहे. त्यामुळे जागृत नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे, असे मत चर्चेदरम्यान मांडले़महामंडळाचा निधी जातो कुठे?चर्मकार समाजाच्या हितासाठी विकास महामंडळाच्या वतीने कल्याणकारी योजना राबविण्याचे धोरण सरकारने जाहीर केले़ परंतु, प्रत्यक्षात मंडळाचा निधी इतरत्र वळून समाजाची दिशाभूल केली जात आहे़ राजकीयदृष्ट्या विविध पक्षांमध्ये विखुरलेल्या चर्मकार समाजामध्ये सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे़ त्यामुळे विविध पक्षांचे नेते केवळ मतांपुरते वापर करतात, अशी नाराजी युवकांनी मांडली़ चर्मकार समाजात मोठी संत परंपरा आहे़ सामाजिकदृष्ट्या एकत्र येण्यासाठी संत रविदास यांचे कार्य प्रेरणादायी असून युवक-युवतींनी आजची दुरवस्था लक्षात घेवून एकत्र येतील, असा आशावादही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला़चर्मकार समाज भवनासाठी हवे सहकार्यडॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत़ शिक्षण व प्रबोधन वारसा स्वीकारून नव्या पिढीने कातडे कमाविणाºया पांरपरिक व्यवसायाला सोडचिठ्ठी दिली़ मात्र, जगण्याचे प्रश्न सुटले नाही़त़ नव्या उद्योग-अर्थव्यवस्थेत चर्मकारांनी मिळेल त्या रस्त्यावर पथारी टाकून बुटपॉलिशचा व्यवसाय करतात, हे वेदनादायी आहे़ चर्मकार बांधवांना चंद्रपुरात हक्काचे समाजभवन नाही़ शहरातील ‘चमार कुंड’ म्हणून ओळखणाºया पारंपरिक जागेवर काहींनी अतिक्रमण केले़ पण, भवन होवू शकेल, इतकी जागा शिल्लक असून, सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी समाज भवनासाठी मदत करावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली़
जागृत नेतृत्वातूनच सुटतील समाजाचे प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:04 PM
‘ऐसा राज चाहू मै, जहॉ सबको मिले अन्न, छोटा बडो सबसम बैठे, रविदास रहे प्रसन्न’ अशी व्यापक मानवतावादी भूमिका घेऊन चर्मकार समाजातील संत रविदासांनी भारतीय मध्ययुगीन कालखंडात जाती आणि धर्मभेदाच्या भिंती उदध्वस्त केल्या़ या परिवर्तननिष्ठ विचारांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते चर्मकार बांधवांमध्ये जागृतीचे कार्य करीत आहेत़ परंतु, अजूनही समस्यांची गुंतागुंत सुटली नाही़
ठळक मुद्देमहाराष्ट्र चर्मकार संघ, संत रविदास पंच मंडळ : पदाधिकारी व युवकांनी मांडली भूमिका