महाविकास आघाडी सरकारचा गोंडवाना विद्यापीठाला मदतीचा हात
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा
फोटो
भद्रावती : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीला भेट दिली. यावेळी त्यांच्याशी विद्यापीठाच्या संबंधी साधक-बाधक चर्चा होऊन बरेच प्रश्न मार्गी निघाले. मागील नऊ महिन्यांत ना. सामंत यांची विद्यापीठाला ही तिसरी भेट आहे. त्यांच्या विशेष सहकार्याने मॉडेल कॉलेज, डाटा सेंटर, विद्यापीठाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे.
नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान विद्यापीठाच्या आदिवासी दर्जासंबंधी तसेच नागपूर विद्यापीठाकडून घेणे असलेल्या सर्वसाधारण निधीसंबंधी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर विवेक शिंदे यांच्याशी चर्चा करून संचालक उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली व हा प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या, असे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर विवेक शिंदे यांनी सांगितले.
तसेच विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीला तत्वतः मान्यता देऊन पुढच्या शैक्षणिक सत्रापासून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचनासुद्धा याप्रसंगी ना.सामंत यांनी दिल्या. यापुढेसुद्धा विद्यापीठाला विविध योजनेंतर्गत वित्तीय मदत देण्याचे त्यांनी आश्वासित केले. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे प्रामुख्याने उपस्थित होते.
===Photopath===
160621\img-20210616-wa0001_1623831810920.jpg~160621\img-20210616-wa0003.jpg
===Caption===
चर्चा करताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कुलगुरू प्र-कुलगुरू तसेच डॉक्टर विवेक शिंदे~चर्चा करताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कुलगुरू प्र-कुलगुरू तसेच डॉक्टर विवेक शिंदे