लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा येथे शालांत परीक्षेच्या विविध शाळेच्या प्रश्नपत्रिका एकच असताना वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतली जात असल्याने पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका पडत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे.वरोरा शहर व ग्रामीण भागामध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू आहे. इयत्ता पाचवी ते सातवीचा पेपर सकाळच्या सत्रात तर आठवी व नवव्या वर्गाचा पेपर दुपारच्या सत्रात घेण्यात येत आहे. यामध्ये वरोरा शहरातील कर्मवीर विद्यालय व लोकमान्य विद्यालयाने परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मुख्याध्यापक संघाकडून घेतल्या आहेत. दोन्ही विद्यालयाच्या प्रश्नपत्रिका एकच असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांचा पेपर एकाच वेळेत घेणे अनिवार्य होते. मात्र दोन्ही शाळा वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेत आहेत.ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्याने सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका घेण्याकरिता दुपारच्या सत्रात परीक्षा देणारे विद्यार्थी प्रतिक्षा करीत असतात. सकाळ सत्रात पेपर सोडवारे विद्यार्थी दुपार सत्रात परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका देत असल्याने त्यांना आधीच प्रश्नोत्तरे माहित होत आहेत. यात अनेक विद्यार्थी गैरमार्गाचाही अवलंब करीत असल्याचे दिसून आले आहे.मुख्याध्यापक संघाकडून प्रश्नपत्रिका घेत असताना एकाच वेळी परीक्षा घेण्याचे भान शाळांना असू नये, याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात केली जात आहे. शाळेच्या शिक्षकांनीच प्रश्न पत्रिका काढण्याचे शासनाचे निर्देश असताना, या निर्देशाला हरताळ फासण्यात आली आहे.शहरातील शाळांच्या परीक्षा वेळापत्रकात तफावत आहे. याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांनी नियोजन करणे गरजेचे आहे.- पुरुषोत्तम रासेकर,अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ वरोरा.
चंद्रपूर जिल्ह्यात परिक्षेआधीच विद्यार्थ्यांच्या हाती येते प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 3:42 PM
वरोरा येथे शालांत परीक्षेच्या विविध शाळेच्या प्रश्नपत्रिका एकच असताना वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतली जात असल्याने पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका पडत आहे.
ठळक मुद्देवरोरा येथे एकाच विषयाची परीक्षा दोन वेगळ्या वेळांमध्येसकाळच्या सत्रातील विद्यार्थी दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना देता प्रश्नपत्रिका