चंद्रपूर : ज्युनियर जेसी विंग जेसीआय गरीमातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयएमए सभागृहात प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन वनिता आहारचे संचालक विनायक धोटे, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. ऋतुजा मुंधडा यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेमध्ये दहा शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक श्री महर्षी विद्या मंदिर, द्वितीय सेंट मायकल स्कूल यांनी पटकावला. विजेत्यांना डॉ. कीर्तीवर्धन दिक्षीत, डॅा.ऋतुजा मुंधडा, प्रथम पुगलिया यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी ज्युनियर जेसी प्रथम पुगलिया, जित टंडन, प्रतिक डावर, भव्या चांडक, आस्था पडगेलवार, रिद्धी लोहीया, रियॉन परेरा, विधी पुगलिया, प्रेम कोरडे, झिनिया समनानी, रिद्धी ठाकूर, कौशल चांडक बेहला मुस्तफा आदींनी परिश्रम घेतले.
ज्युनियर जेसी विंगतर्फे प्रश्नमंजूषा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:29 AM