शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

गुलबर्गा विद्यापिठातून आलेले १२ विद्यार्थी चंद्रपुरात राहत्या घरी देखरेखीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 3:46 PM

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठात शिक्षण घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ पैकी १२ विद्यार्थी स्वगृही परतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी देखरेखीखाली ठेवले असून आरोग्य विभागाची यंत्रणा त्यांची काळजी घेत आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेकडून काळजी विदर्भातील १५ विद्यार्थी परतणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसला तरी बाहेरून येणाऱ्या संशयितांची संख्या वाढीवर असल्यामुळे जिल्हा कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आहे. अशातच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठात शिक्षण घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ पैकी १२ विद्यार्थी स्वगृही परतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी देखरेखीखाली ठेवले असून आरोग्य विभागाची यंत्रणा त्यांची काळजी घेत आहे. पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात ठेवलेले विदभार्तील १५ विद्यार्थी परत येणार आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ५, वर्धा जिल्ह्यातील ६ तसेच नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ विद्यार्थी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा या विद्यापिठात शिक्षण घेत आहेत. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आढळला होता. भारतात कोरोनामुळे दगावलेला पहिला रुग्णही गुलबर्गा येथील आहे. यामुळे येथील प्रत्येकाची सरकार काळजी घेत आहेत. गुलबर्गा विद्यापीठात देशभरातील अनेक विद्यार्थी शिकत आहेत. हे विद्यार्थी स्वगृही परतत आहे. त्यांची काळजी घेण्याची सूचना सरकारने संबंधित जिल्हा प्रशासनाला दिलेली आहे. या विद्यापीठात १७ विद्यार्थी हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्यातील १२ विद्यार्थी हे १५ मार्चपूर्वी जिल्ह्यात पोहचले आहे. यामध्ये राजुरा तालुक्यातील ८, बल्लारपूर २ व भद्रावती व नागभीड तालुक्यातील प्रत्येकी एका विद्याथ्यार्चा सामावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात परत येणा?्या ५ विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर येथील १ व राजुरा येथील ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याच घरी आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्याच्या सूचना आहे. यानुसार जिल्ह्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा कर्तव्य बजावत आहे.

 

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थी