शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

टी-४९ वाघिणीच्या तीन मादी बछड्यांना रेडिओकॉलर आयडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 11:50 AM

ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी वनविभागातील वाढते व्याघ्र हल्ले रोखण्यासाठी अभ्यास करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागात वाढत्या वाघांच्या हल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रदेशात वाघांच्या स्थालांतरणाचा अभ्यास’ या संशोधन प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे.ब्रह्मपुरी वनविभागातील ३ छाव्यांना रेडिओ कॉलरआयडी करण्यात आल्यामुळे ब्रह्मपुरी वनविभागातील वाघांच्या हालचालीवर सनियंत्रण करण्यास मोठी मदत होणार आहे. या मोहिमेमुळे सदर परिसरात घटना घडल्यास त्या घटनेबाबत ठोस पुरावे मिळविण्यासाठी भविष्यात त्याचा उपयोग होईल.ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिवारात वास्तव्यास असलेल्या टी - ४९ वाघिणीच्या चार मादी बछड्यांपैकी ई - १ व ई - ४ ला दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी कोेरेगाव बिटातील कक्ष क्र. १५७ मध्ये खाडीमुंडा खोदतलाव परिसरात रेडिओ कॉलरआयडी लावण्यात आले आणि त्यांची योग्य तपासणी करून त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले आहे. दि. ०१ मार्च २०१८ रोजी चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. रामाराव यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी वनविभागातील टी - ४९ वाघिणीच्या कब ई - ३ ला त्याच परिसरात रेडीओ कॉलर आयडी लावण्यात आले. सदर मोहिमेत भारतीय वन्यजीव संस्था देहरादूनचे पशुचिकित्सक डॉ. पराग निगम, डॉ. बिलाल हबीब तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी चेतन पातोड यांच्या चमुने बेशुद्ध करून रेडिओ कॉलरआयडी लावली.सदर मोहिमेत ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह, ब्रह्मपुरी वनविभाग प्रादे. व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वर बोंगाळे, दक्षिण ब्रह्मपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर, उत्तर ब्रह्मपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ब्राह्मणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांचा समावेश होता.रेडीओ कॉलर आयडी लावलेल्या तीनही वाघीण तरूण आहे. त्यांचे जीवनमान अधिक आहे. मात्र त्यांच्याबद्दल अधिक माहिती वनविभागाकडे नाही. त्या कुठे जातात. त्यांचे भ्रमणमार्ग कोणते. त्यांचा एकूणच अभ्यास केला जाणार आहे. शिवाय या माध्यमातून ब्रह्मपुरी वनविभागात वाघांचे होणारे हल्ले याबाबीही लक्षात येणार आहे.- व्ही. एस. रामाराव, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर

टॅग्स :Tigerवाघ