शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दारुविक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 5:00 AM

चारचाकी वाहनातून एमआयडीसी पडोली दाताळामार्गे चंद्रपुरकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महर्षी विद्यालय दाताळा वळणाजवळ नाकाबंदी करुन एमएच ३४ ए ०८०४ या वाहनाला थांबवून तपासणी करुन वाहनातून ९५ हजार रुपये किंमतीच्या ९५० नग देशी बॉटल व वाहन असा चार लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देचार जणांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाताळा येथे नाकाबंदी करुन चार लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमालासह आशिष वसंत दरबेसवार (३०) रा. महात्मा फुले चौक, तर दुसऱ्या कारवाईत सागर रामकिशोर कंजर (२६) जलनगर याला ताब्यात घेवून ३५ हजार रुपये तर तिसºया कारवाईत चार लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.चारचाकी वाहनातून एमआयडीसी पडोली दाताळामार्गे चंद्रपुरकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महर्षी विद्यालय दाताळा वळणाजवळ नाकाबंदी करुन एमएच ३४ ए ०८०४ या वाहनाला थांबवून तपासणी करुन वाहनातून ९५ हजार रुपये किंमतीच्या ९५० नग देशी बॉटल व वाहन असा चार लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.दुसºया कारवाईत जलनगर येथे छापा टाकून सागर रामकिशोर कंजर (२६) जलनगर याला ताब्यात घेवून प्लास्टिक ड्रममध्ये गुळ आंबा सडवा आणि इतर साहित्य असा एकूण ३५ हजार ४७० रूपयाचा माल जप्त केला. तर तिसºया कारवाईत एका चारचाकी टाटा इंडिका वाहनातून १६ बॉक्स देशी दारु व वाहनचा असा चार लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात संजय, राजेंद्र खनके नागरे, अमजद आदींनी केली.घुग्घुसमध्ये दीड लाखांची दारु जप्तघुग्घुस मार्गाने चंद्रपूरकडे जाणाऱ्या एम एच ३४ बीएफ २२८९ वाहनाला धानोरा टोलजवळ थांबवून झडती घेऊन दीड लाख रुपये किंमतीच्या पंधराशे बॉटल देशी दारू वाहनातून जप्त करण्यात आली. या कारवाईत वाहनासह दारु असा एकूण सहा लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मयुर सत्तार शेख (२४), दिनेश रविंद्र आगबतनवार (२४) रा. मूल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई ठाणेदार राहुल गांगुर्डे, स.पो.नि चहांदे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे आमटे, सचिम, विनोद, महेश, सुधिर, सचिन, शार्दुल, निलेश, रणधिर आदींनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस