बल्लारपूर येथील रेल्वे जंक्शनवरून पूर्वी मोठ्या प्रमाणात रेल्वे धावत होत्या. त्यामुळे बल्लारपूर जंक्शनवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत होते. अनेकजण नातेवाइकांना सोडण्यासाठी यायचे, त्यांना दहा रुपयाची प्लॅटफॉर्म तिकीट काढणे अनिवार्य होते. त्यातून मोठे उत्पन्न मिळत होते. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीपासून ट्रेन बंद करण्यात आले. त्यानंतर विशेष रेल्वेफेऱ्यातंर्गत केवळ ३० ट्रेन धावत आहेत. यादरम्यान रेल्वेस्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफार्म तिकीट दहा रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले. मात्र आता कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने प्लॅटफार्म तिकीट कमी करून ३० रुपये करण्यात आले आहे. मात्र बल्लारपूर जंक्शनवरून आता मोजक्याच रेल्वे धावत असल्याने प्रवाशासह प्लॅटफार्म येणाऱ्यांची संख्या घटली आहे.
बॉक्स
प्रवाशांची संख्या कमीच
बल्लारपूर जंक्शनवरून आता केवळ ३० रेल्वेच धावत आहेत. त्यातही स्पॉट तिकीट बंद असल्याने केवळ आरक्षित असलेल्या तिकिटावरच प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र अद्यापही प्रवाशांमध्ये कोरोनाची दहशत कमी आहे. त्यामुळे अनेकजण प्रवास टाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर मोजकेच प्रवासी दिसून येतात.
-----
उत्पन्नात घट
पूर्वी प्लॅटफार्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. परंतु, त्यासाठी दहा रुपये तिकीट आकारण्यात येत होते. त्यामुळे मोठे उत्पन्न मिळत होते. परंतु, कोरोनामुळे रेल्वे बंद झाल्या, तसेच गर्दी टाळण्यासाठी तिकीटही ५० रुपये करण्यात आले होते. त्यामुळे आपोआपच उत्पन्न घटले. आता तिकीट ३० रुपये करण्यात आले आहे. मात्र लोकल ट्रेन बंद असल्याने तसेच विशेष रेल्वे सुरू असल्याने मोजकेच प्रवासी दिसून येतात. त्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.
----
कोट
लोकल ट्रेन बंद आहेत. केवळ विशेष रेल्वेच धावत आहेत. पूर्वीपेक्षा प्रवास करण्याची संख्या घटलेली आहे. प्लॅटफार्म तिकीट ५० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आली आहे. परंतु, स्थानकावर पूर्वीप्रमाणे गर्दी दिसून येत नाही.
- ओमप्रकाश कुमार, तिकीट निरीक्षक, बल्लारपूर
--------
बल्लारपूर स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे -३०
रोज प्रवास करणाऱ्याची संख्या - १२००