पळसगाव (पिपर्डा ) : चिमूर तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तलावाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच पळसगाव पिपर्डा व परिसरात पावसाचा जोर वाढत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या सतत चाललेल्या संततधारेमुळे पळसगाव येथील धनराज कवडू मेश्राम यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
धनराज मेश्राम हे मंगळवारी सायंकाळी जेवण करीत असताना अचानकपणे भिंतीची माती खाली घसरू लागली. तेव्हा त्यांनी भिंतीकडे बघितले असता भिंत कोसळणार, असे त्यांना वाटले. लगेच त्यांनी घरातील लोकांना समोरील छपरात जेवणाचे साहित्य घेऊन सोबत नेले. त्यानंतर भिंत कोसळली. सुदैवाने ते कुटुंब बचावले. मात्र अजूनही मेश्राम कुटुंबातील सदस्य त्याच मोडक्या झोपडीत राहत आहेत. एकाच खोलीत ते पती पत्नी व दोन मुले असा परिवार घेऊन राहत आहेत. नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात येऊन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी धनराज मेश्राम यांनी केली आहे.
280721\img20210728085726.jpg
पळसगांव येतील धनराज मेश्राम यांचे पावसाने हरविले घराचे छप्पर उडाले असून संसार उघड्यावर पडला आहे