लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : असंख्य शहरात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष्य असून मानवाचे मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात पाण्याच्या एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रू गाळावे लागतील. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले चंद्रपूर शहर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी साठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन लोक चळवळीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करीत आहे. ही कौतुकाची बाब असून रेन वॉटर हार्वेस्टिंग आता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, वन व नियोजनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.शहरातील दिव्यांगांना अनुदान तसेच निवाऱ्यापासून वंचित असलेल्या जनसामान्यांना घरकूल योजना राबवली जात आहे. यात सातत्य ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी व अधिकाºयांनी आपले अधिकार लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरावे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.चंद्रपूर महानगरपालिकाद्वारे आयोजित घरकूल हस्तांतरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग व दिव्यांगाकरिता अनुदान वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, सभागृहाचे गटनेते वसंतदेशमुख, महिला व बालकल्याण सभापती शितल गुरनुले, सभापती कल्पना बाबुलकर, सभापती सुरेश पचारे, सभापती प्रशांत चौधरी, उपसभापती चंद्रकला सोयाम उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, देशातील जनसामान्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री यांचा आग्रह असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लोकांना हक्काचे घर मिळत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच टक्के निधी दिव्यांगांना स्वत:चा रोजगार उभा करण्याकरिता अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे. सोबतच असंख्य शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला जात असताना महानगरपालिकेच्या पुढाकाराने रेन वॉटर हार्वेस्टिंग ची लोकचळवळ यशस्वीरित्या राबवली जात आहे. या तीनही आघाडयांवर महानगरपालिका यशस्वीरित्या काम करीत आहे. ही प्रशंसनीय बाब असून याची दखल देशपातळीवर घेतली जाईल. असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. आपण किती वर्षे पदावर राहतो. त्यापेक्षा मनुष्य व वसुंधरेची किती सेवा केली. हे फार महत्त्वाचे असून पावसाचा प्रत्येक थेंब भूमातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी पक्षपात विसरून महानगरपालिकेच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच या मोहिमेची शहरातील लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करणाºया इको-प्रो या संस्थेच्या पदाधिकाºयांचा सत्कारही करण्यात आला.शहरातील विहिरींचे नूतनीकरण कराचंद्रपूर शहरातील विहिरींचे नूतनीकरण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. तसेच बोअरवेल नादुरुस्त असतील तर त्या दुरुस्त कराव्या. याकरिता लागणाºया निधीची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दिव्यांगांनाही स्वत:चा रोजगार निर्माण करता यावा, याकरिता इलेक्ट्रॉनिक व्हेईकलच्या माध्यमातून चालते फिरते दुकान एक हजार लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यापैकी शंभर वाहन चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांगांना वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना किराणा, हस्तकला, भाजीपाला, खाण्याच्या वस्तू इत्यादींचे दुकान लावून स्वत:चा रोजगार निर्माण करता येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
रेन वॉटर हार्वेस्टिंग लोकचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:38 AM
असंख्य शहरात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष्य असून मानवाचे मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात पाण्याच्या एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रू गाळावे लागतील. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले चंद्रपूर शहर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी साठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन लोक चळवळीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करीत आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : घरकुल व रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी दिले अनुदान