लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिकांना धोक्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यंदा उशिराने पावसाचे आगमन झाले. त्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. जिल्ह्यात जवळपास ८० टक्के कोरडवाहू शेती आहे. नैसर्गिक पाण्यावरच शेती पिकविली जाते, अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.जिल्ह्यात ११ जुलै रोजी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने खंड दिला. दरम्यान, काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सद्यस्थितीत जमिनीत ओल असल्याने दोन ते तीन दिवस ही पिके तग धरू शकतील. परंतु त्यानंतर जर पाऊस आला नाही तर पिके करपण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची शक्यता आहे.पाऊस यावा, यासाठी शेतकरी वरुणराजाकडे प्रार्थना करीत आहे. यावर्षी उन्हाची तिव्रता अधिक होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांच्याकडील जलस्त्रोताची पातळी देखील धोकादायक स्थितीत आहे. अद्याप पाहिजे तसे नद्या, नाले भरले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस कोसळल्याने यावर्षीचा शेतीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सतत दुष्काळमागील काही वर्षांपासून सतत दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे. यावर्षी तरी पिक चांगले येईल, या आशेने शेतकºयांनी इतकडून-तिकडून पैसा जमा करून पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंता आणखी वाढली आहे. एक-दोन दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर ही चिंता आणखीच वाढणार आहे.
पावसाची दडी, पिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:21 PM
चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिकांना धोक्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देसिंचनाची सुविधा नाही : जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची काळजी वाढली