लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निसर्गातील अनेक पशु-पक्षी-कीडे यांच्या हालचालीवरून पर्यावरणात होणाऱ्या घडामोडींचा अंदाज माणूस पिढ्यान्पिढ्यापासून बांधत आहे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी अंदाज बांधणे सुरु केले असून शेती कामाला आता वेग आला आहे.एरवी कधी न दिसणारा दोन लांब मिश्यावाला मृगाचा किडा दिसला की मृग नक्षत्र लागले याचा अंदाज येतो. आपले अन्न तोंडात घेऊनलाखो मुंग्या जेव्हा रांगेत जावून बिळात अन्न संचय करायला लागतात, तेव्हा पावसाळा जवळ आल्याचा अंदाज घेतला जातो. अशाचप्रकारे पावसाळ्यापूर्वी कावळ्यांनी बांधलेल्या घरट्यांचा जागेवरुन पाऊसपाणी कसे राहील याचे गणित ग्रामीण भागातील शेतकरी लावतात. सद्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात कावळ्यांनी तोंडात काडीकाडी आणून घरटे बांधायला सुरुवात केली आहे. यावर्षी कावळे झाडावर काठाकाठांनी घरटे बांधत आहेत. यावरुन यावर्षी सर्वबाजूंनी पाऊस पडेल, असा अंदाज शेतकरी बांधत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतींच्या कामांना वेग आला असून पहाटेपासून शेतकरी कामाला लागले आहे.काय सांगतो घरट्यांचा अंदाजकावळ्यांनी जर झाडाच्या बुंध्याशी मजबूत जागेवर घरटे बांधले तर त्यावर्षी मुसळधार पावसाचा अंदाज बांधला जातो. घरटे जर झाडाच्या शेंड्यावर असेल तर पाऊस तुरळक पडतो आणि घरटे जर झाडाच्या काठाकाठाने चोहोबाजूंनी बांधले असेल तर पाऊस चोहोबाजूंनी सर्वसाधारण पडतो. वर्षानुवर्षाच्या अनुभवावरुन वयोवृद्ध हा अंदाज बांधतात.हा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहणे अजून थोडे दूर असले तरी कावळ्यांच्या घरट्यावरुन तूर्तास यंदा चांगल्या पावसाचे संकेत मिळत असल्याने बळीराजा सुखावला आहे.
घरट्यांवरून लावला जातो पावसाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:45 PM
निसर्गातील अनेक पशु-पक्षी-कीडे यांच्या हालचालीवरून पर्यावरणात होणाऱ्या घडामोडींचा अंदाज माणूस पिढ्यान्पिढ्यापासून बांधत आहे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी अंदाज बांधणे सुरु केले असून शेती कामाला आता वेग आला आहे.
ठळक मुद्देशेती कामांना वेग : पक्ष्यांकडून पावसाळ्याचा वेध, घरटे बांधण्यासाठी लगबग