शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

By admin | Published: September 21, 2015 1:12 AM

नुकत्याच झालेल्या पावसाने कोरपना व जिवती तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले.

नगदी पिके अस्मानी संकटात : शेतकऱ्यांना मदतीची आसनांदाफाटा : नुकत्याच झालेल्या पावसाने कोरपना व जिवती तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. यातच कवठाळा, पिंपळगाव, नांदा, बाखर्डी, भोयगाव, वनसडी, कोरपना आदी भागातील मिरचीचे पीक संकटात आले आहे. हवा व पाण्यामुळे फळाला आलेली झाडे कोलमडून पडली असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हरावला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसासह मिरचीची लागवड केली. कापूस पिकाच्या तुलनेत मिरचीचा उत्पादन खर्च अधिक आहे. या महिन्यात पीक फळावर आले असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पिकाची हानी झाली. मिरची व इतर नगदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते, औषधी व मजूर लावून निंदणही उरकवून टाकले. पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चापैकी अंदाजे ७५ टक्के खर्च यावर्षी शेतकऱ्यांनी आतापर्यंत केला आहे. कापसाची वेचणी एका महिन्यानंतर करायची तयारी शेतकऱ्यांनी केली तर मिरचीच्या उत्पादनासाठीही मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांनी यावर्षी नव्याने ठिंबक सिंचनाचाही खर्च केलेला आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, औषधे आदींची उधारी देणे बाकी असताना पिकांची ही अवस्था झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. याचबरोबर सोयाबीन, उडीद, मूग, तूर याही नगदी पिकांना काही भागात मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. (वार्ताहर)उसगावातील कपाशीवर लाल्या अज्ञात रोगाचा प्रादूर्भावशेतकरी हवालदिलघुग्घूस नजीकच्या उसगाव पंचक्रोशीतील कापसाच्या झाडावर लाल्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव व त्याबरोबरच अज्ञात रोगाचे आक्रमण झाले आहे. अडीच ते तीन हजार एकर जमिनीवर कपाशीचे झाडे करपत असल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या परिसरातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या शंभर एकरवरील पीक नदीच्या पाण्यात बुडाले आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत. अगोदरच नापिकी त्यात वेळेवर पाऊस नाही, शेतात जंगली जनावरांचा धुमाकूळ याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या कपाशीच्या झाडांची जोमाने वाढ होत असून फुले, बोंड लागले आहे. मात्र त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी अधिकारी भोये यांच्या मार्गदर्शनानुसार हजारो रुपये खर्च करून औषधांची फवारणी केली. त्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून कपाशीची झाडे पिवळी पडत असून त्याची फुले गळू लागली आहेत. याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक संकटांनी अगोदरच बेजार असलेला शेतकरी अधिक चिंतातूर झाला आहे. नुकताच वर्धा नदीच्या काठावरील शेतीतील उसगाव, वढा, पांढरकवडा या शेत शिवारातील सुमारे शंभरपेक्षा अधिक एकर जमिनीवरील पिके पाण्याखाली आल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कृषी विभागाने सदरच्या अज्ञात रोगाचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती नामदेव ठाकरे, सरपंच निवेता ठाकरे, उपसरपंच माया जुमनाके, धनंजय ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर आदींनी या गावातील शेतांना भेटी देऊन पाहणी केली.