तीन वर्षांच्या जनजागृतीनंतर स्थिती ‘जैसे थे’चचंद्रपुरात घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविल्याशिवाय पाणी टंचाईवर मात करणे शक्य नाही, हे मनपा प्रशासनाला कळून आले आहे. त्यामुळे महापौर व आयुक्त याबाबत गंभीर झाल्याचे दिसते. चंद्रपुरातील अधिकाधिक घरे, इमारतींमधे रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविण्याच्या दृष्टीने पुढील दोन महिने मनपाद्वारे मोठया प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या घरी’ ही मोहीम सुरु केली जाणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनपाच्या राणी हिराई सभागृहात बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त संजय काकडे यांनी अनेक सूचना केल्या. मनपाचे अधिकारी, कर्मचारी, बहुतांश नगरसेवक, नगरसेविका यांच्या इमारतींमध्येही ही सिस्टीम अद्याप बसविलेली नाही. फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच मनपा कर्मचारी यांच्या घरी सदर यंत्रणा लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.चंद्रपुरात ८७ हजार मालमत्तामनपा हद्दीत ८७ हजार मालमत्ता आहेत. यातील अधिकाधिक इमारतींमधे ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व इमारती, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, सार्वजनिक शौचालये अशा एकूण ५२ इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही यंत्रणा बसविण्यात आली असून शासकीय कार्यालये प्रामुख्याने जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय, नियोजन भवन कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, कृषी भवन इत्यादी इमारतींवर मनपातर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे.सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे- राखी कंचर्लावारवाढती लोकसंख्या, झपाटयाने होणारे शहरीकरण, वेगाने कमी होत जाणारे जंगलाचे क्षेत्र, शहरासह ग्रामीण भागातही वाढत चाललेले प्रदूषण या सर्वांचा परिणाम पाणीसाठयावरही होऊ लागला आहे. चंद्रपूरचे तापमान वर्षानुवर्षे वाढतच चालले आहे. आज अनेक घरी बोअरवेल, विहिरींच्या माध्यमातून पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय खालावली आहे. यावर उपाययोजना करण्यास काही ठोस निर्णय घेणे हे आता गरजेचे झाले आहे, असे महापौर राखी कंचर्लावार यांनी या बैठकीत सांगितले. त्यामुळे आता 'रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घरी लावण्यात येईल. याकरिता सर्व नगरसेवक नगरसेविका पूर्णत: सहकायर करणार असून त्यांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे.
मनपाचा पुन्हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 6:00 AM
'रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या घरी’ ही मोहीम सुरु केली जाणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनपाच्या राणी हिराई सभागृहात बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त संजय काकडे यांनी अनेक सूचना केल्या.
ठळक मुद्देकर्मचारी, पदाधिकाऱ्यांच्याच घरात सिस्टीम नाही