पावसाळ्यात अतिसाराची लागण होण्याची शक्यता असते. दिवसातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शौचाला गेल्यास त्याला ‘अतिसार’ म्हणतात. हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्यापासून होतो. विविध प्रकारचे विषाणू, जीवाणू तसेच इतर परजिवींमुळे हा आजार होतो. या आजारामध्ये प्रथम जुलाब सुरू होऊन त्यानंतर उलट्या होतात.
गॅस्ट्रो हा आजार वेगवेगळ्या प्रकाराच्या जीवाणू व विषाणुमुळे होतो. या आजारात उलट्या व जुलाब एकाच वेळी सुरू होतो. जुलाब वांत्या चालू आहेत़ पण जलशुष्कता नाही, अशावेळी क्षारसंजीवनी, पेज अथवा सरबतचा वापर करावा. जलशुष्कतेची लक्षणे असल्यास क्षारसंजीवनी व घरगुती पेय द्यावी. तीव्र जलशुष्कता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करावे.
शुद्ध पाणीपुरवठा, वैयक्तिक स्वच्छता, मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावावी. बालकांना गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. कॉलरा हा आजार व्हिब्रीओ कॉलरा या विशिष्ट जीवाणुमुळे होतो. व्हिब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतड्याला संसर्ग झाल्याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयांमधील स्त्री-पुरुषांमध्ये आढळतो.
पटकी आजार झाल्यास पेजेसारखे वारंवार जुलाब, उलट्या होतात़ ठोके वाढतात़ तोंडाला कोरड पडते़ वारंवार तहान लागते़ स्नायूंमध्ये गोळे येतात़ अस्वस्थ वाटून चक्क येऊ शकते़ पावसाळ्यात ही लक्षणे दिल्यास आरोग्य केंद्रात दाखल व्हावे़ जेवणापूर्वी बालकांचे हात नेहमी साबणाने धुऊन द्यावेत़ स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा बाळाला भरविण्यापूर्वी मातांनी विशेष काळजी घ्यावी़, जुलाब असलेल्या रुग्णाची सुश्रुषा केल्यानंतर साबण उपलब्ध नसेल तर राखेनेदेखील हात स्वच्छ करता येते़ बालकांचे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. मातांनी बाळाला तातडीने रुग्णालयात आणावे, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविले आहे़
बाॅखस्
घर,परिसर ठेवा स्वच्छ
घर व परिसराची स्वच्छता ठेवली नाही तर अनेक आजार होतात़. प्राण्यांच्या मलमूत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये़ लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात उपचार करावे़.
बाॅक्स
पाणी उकळूनच प्या
दुषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात़ दूषित झालेला परिसर हाही आजारांचा प्रमुख स्त्रोत असतो. केवळ बालकच नाही तर व्यक्तींनीदेखील पिण्याचे पाणी उकळूनच प्राशन करावे़ खूप दिवसांचे पाणी साठवून ठेवू नये़ स्वयंपाकघरातील वस्तूंची स्वच्छता ठेवावी़ पालेभाज्या तसेच अन्य पदार्थ घरी आणल्यानंतर योग्य काळजी घ्यावी़ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निरोगी राहतील, याकडे विशेष लक्ष द्यावे़.