चंद्रपूर : राज्यात कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी लढणाऱ्या श्रमिक इमारत व इतर बांधकाम संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी कामगार नेते राजू लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अंबिका हिंगमिरे यांनी ही नियुक्ती केली आहे. नुकत्याच झालेल्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यामध्ये जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष पदी राजू लांडगे, उपाध्यक्ष शुभम गेडाम, सचिव योगेश निफंगे, सहसचिव रवी ढवस, कोषाध्यक्ष कमलेश आत्राम, सदस्यपदी विजय पाझारे, प्रदीप लांडगे, गजानन लोणारे, विजय पाटील, सुरेश चांदेकर, महेश बावणे, बळवंत ठाकरे, सुरेश शेलार, किरण पुणेकर, स्नेहल देवगडे, नारायण शिकरदार, आनंद शिकरदार, देवानंद मातबते, संकेत साखरकर तसेच महिला सदस्यपदी विजया मारबत, हेमलता पोइतकर, संध्या तोगर, किरण प्रसाद, मंगला कावळे आदींची नियुक्ती करण्यात आली.