मान्यवरांचा सूर : ‘त्या’ अनामिक स्वातंत्र्यविरांची समाजाने दखल घ्यावीराजुरा : स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. हैद्राबाद मुक्तीसाठी लोकांनी मोठे आंदोलन केले. बलिदान देण्यापासून येथील लोक कधीही मागे हटले नाही. स्वतंत्रता मिळाल्यानंतर काहीची नावे इतिहासात नोंदली गेली. परंतु स्वतंत्रता प्राप्तीसाठी एका संपूर्ण पिढीने मूल्यांची जोपासना करीत मोठा संघर्ष केला, अशा अनामिकांच्या नावाची इतिहासाने दखल घेतली नाही. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्यांची समाज दखल घेणार की नाही आणि स्वतंत्रता प्राप्तीनंतर आम्हाला अजूनही दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत का, असे परखड मत वक्त्यांनी मुक्तीसंग्राम दिनी आयोजित कार्यक्रमात केले. राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीतर्फे स्थानिक शिवाजी संकुलात मुक्तीदिन सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शा.वा. श्वान यांनी भूषविले. उद्घाटन पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून वर्धेच्या हिंदी विश्वविद्यालयाचे प्रा. डॉ. अनवर सिद्धीकी, आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. अॅड.वामनराच चटप, सुदर्श निमकर, समन्वयचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, उपजिल्हाधिकारी विनोद हरकंडे, अनिल ठाकूरवार, अॅड. सदानंद लांडे, डॉ. सुरेश उपगन्लावार, अरुण मस्की, रमेश नळे, प्राचार्य दौलत भोंगळे, डॉ. उमाकांत धोटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, बंडू माणूसमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सरदार पटेल व रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमांना अभिवादन करुन व दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली. सोहळ्यात उपस्थितांच्या मनाचा ठाव घेत देश आणि समाज एकसंघ करण्यासाठी सर्वांनीे संकल्प करावा, असे प्रतिपादन करीत हैद्राबाद मुक्तीच्या इतिहासाची पाने श्रोत्यांसमोर उलगडूनन दाखविली.प्रास्ताविक डॉ. उमााकंत धोटे, संचालन किशोर कवठे व रंजिना चाफले आणि आभार वैशाली पावडे यांनी केले. स्वराप्रितीच्या अल्का सदावर्ते यांच्या संचाने सुंदर स्वागत गीत, गणेशस्तवण व शेवटी वंदेमारतम सादर केले. (शहर प्रतिनिधी)
राजुरा मुक्तिदिन सोहळा उत्साहात साजरा
By admin | Published: September 20, 2015 1:35 AM