रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळीच्या नियंत्रणासाठी आरोग्याच्या दृष्टीने पाणी शिंपडले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. सकाळी आठ वाजल्यापासून उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून जुना मार्गावरून वाहतूक वळती केली. या मार्गावर फ्लायचे ॲशचे ढिगारे पसरले असल्यामुळे धुळीचे लोळ उठले होते. जवळपासच्या अंतरावरील वाहनचालकांना काहीच दिसत नसल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अविनाश जाधव यांनी उपविभागीय अभियंता बाजारे व रेल्वे विभागाचे अभियंता सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि या मार्गावर तत्काळ पाणी शिंपडण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.
उड्डाणपुलावरील कामकाज करण्याबाबत रेल्वे विभागाने पत्र दिले होते. मात्र, एक-दोन तासांचे काम असेल असे सांगण्यात आले होते. तसेच डायवर्षण मार्गावर पाणी स्प्रे करण्याचे काम संबंधित रेल्वे विभागाने करायला हवे होते.
- आकाश बाजारे,
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राजुरा.