चंद्रपूर : कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, दोन दिवसांवर राखीपौर्णिमा येऊन ठेपली असल्याची महामंडळाने बसफेऱ्या वाढविल्या आहेत. तसेच प्रवासीसुद्धा वाढले आहेत. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांनी गजबजलेले दिसून येत आहे.
कोरोनाने पहिल्यादांच महामंडळांची बसफेरी बंद करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना टप्प्याटप्याने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता निर्बंध हटविल्याने महामंडळाच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यातच राखीपौर्णिमा असल्याने अनेक जण आपल्या बहीण-भावांकडे जात असल्याने प्रवशांची संख्या वाढली आहे.
बॉक्स
प्रवाशांची गर्दी
चंद्रपूर बसस्थानकासह जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
पूर्वी ५० टक्के क्षमतेने धावणाऱ्या बसफेऱ्या आता पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यातच राखीपौर्णिमा असल्याने प्रवासी संख्या वाढली आहे.
खासगी वाहनाची संख्यासुद्धा वाढली असून प्रवासी वाढले आहेत.
बॉक्स
मास्कचा वापर बंद
प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्याने बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यामुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र, प्रवासी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अनेक जण विना मास्क प्रवास करीत आहेत.
बॉक्स
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
जीटी एक्स्प्रेस
संघमित्रा एक्स्प्रेस
ताडोबा एक्स्प्रेस
नवजीवन एक्स्प्रेस
बॉक्स
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
चंद्रपूर-गडचिरोली
चंद्रपूर-नागपूर
चंद्रपूर-चिमूर
चंद्रपूर-राजुरा