शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

प्रल्हाद ठक यांनी स्वतःच्या रक्ताने रंगविलेल्या चित्रांची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 5:00 AM

कर्मयोगी बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीने आनंदवनातील मूकबधिर शाळेत कलाशिक्षक म्हणून प्रल्हाद ठक यांची नियुक्ती केली. कर्मयोगी बाबांच्या प्रेरणेने प्रल्हाद ठक प्रभावित झाले. त्यांनी चंद्रपूर पोलीस ग्राउंडवर महारांगोळी काढण्याचा विक्रम केला. यासोबतच स्वतःच्या रक्ताने थोर समाज सेवकांचे पेंटिंग्ज तयार केले. त्यांच्या आनंदवन चौक गजानन नगर स्थित असलेल्या गॅलरीला अचानक आग लागली आणि हे सर्व संपून गेले.

ठळक मुद्दे१७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : स्वतः  दिव्यांग  असताना कर्मयोगी यांच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या एका शिक्षकाने स्वतःच्या रक्ताने थोर महात्म्यांचे पेंटिंग्ज तयार केले. घरात काटकसरीने आर्ट गॅलरी लावली. या गॅलरीला आग लागली. त्यात रक्ताने तयार केलेले पेंटिंग्ज भस्मसात झाले त्यामुळे महारांगोळीकार हतबल झाला आहे.स्वतः दिव्यांग असताना त्याने कलेचा छंद असून तो जोपासला. कर्मयोगी बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीने आनंदवनातील मूकबधिर शाळेत कलाशिक्षक म्हणून प्रल्हाद ठक यांची नियुक्ती केली. कर्मयोगी बाबांच्या प्रेरणेने प्रल्हाद ठक प्रभावित झाले. त्यांनी चंद्रपूर पोलीस ग्राउंडवर महारांगोळी काढण्याचा विक्रम केला. यासोबतच स्वतःच्या रक्ताने थोर समाज सेवकांचे पेंटिंग्ज तयार केले. त्यांच्या आनंदवन चौक गजानन नगर स्थित असलेल्या गॅलरीला अचानक आग लागली आणि हे सर्व संपून गेले.शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास खालच्या मजल्यावरील गॅलरीत धूर निघत असल्याचे त्यांना लक्षात आले. खाली जाऊन बघितले तर अर्धेअधिक चित्रे, रंग आणि रंग कामाचे साहित्य आगीने गिळंकृत केले होते. आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या कुटुंबीयांनी केला. मात्र तोपर्यंत सारे रंग काळवंडले होते. चित्रांची किंमत आणि त्याचे झालेले नुकसान याचे मोल सांगता येणे कठीण आहे. तरी अंदाजे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.  भिंतीचे रंग उजळतीलही मात्र स्व-रक्ताने रंगविलेले चित्र पुन्हा कसे उभे राहतील, असा यक्षप्रश्न प्रल्हाद ठक यांच्या पुढे उभा ठाकला आहे.

लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये झाली होती नोंदआनंदवनातील मूकबधिर विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रल्हाद ठक या चित्रकाराची ओळख सातासमुद्रापलीकडे आहे. महारांगोळीकार ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले रंगकर्मी ठक यांनी स्वत:च्या रक्ताने समाजसेवक आणि क्रांतिकारकांचे काढलेले अनेक चित्र डोळ्यात भरण्यासारखे आहेत. याकरिता त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. पुणे येथील बालगंधर्व ते जे.जे. आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनी या त्यांच्यातील दमदार कलावंताची साक्ष देतात. रंग कलेचा हा आस्वाद वरोरा शहरातील नवोदित चित्रकारांना पथदर्शी ठरावा म्हणून त्यांनी ठक आर्ट गॅलरी हे दालन आपल्या घरीच इतरांकरता मोकळे केले.  त्या ठिकाणी कॅनव्हास पेंटिंग, ॲक्रेलिक पेंटिंग, पोस्टर कलर पेंटिंग येथपासून तर स्वतःच्या रक्ताने कुंचल्यांना आकार देत रंगविलेले अनेक क्रांतिकारकांचे चित्र हे सर्व आर्ट गॅलरी  रसिकांची दाद मिळवत होते.  एवढेच नव्हे, तर एखाद्या हौशी कलावंताला कुंचला हातात घेऊन रंग भरावे असे वाटले तर तीही सोय त्यांनी गॅलरीत केली होती. उभ्या लाकडी स्टँडवर लावलेला कागद, पेंसल्स याची साक्ष देत होता.

 

टॅग्स :paintingचित्रकलाfireआग