निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी.
बल्लारपूर : एकीकडे पेट्रोलच्या किमती शंभरच्या वर गेल्या असताना, भाजप केंद्र सरकारने देशातल्या खतांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवून खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. तसेच ही दरवाढ कमी केली पाहिजे, यासंदर्भात बल्लारपूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खतांच्या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे.
डीएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी ११८५ रुपयांना होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.३६ चे ५० किलोचे पोते ११७५ रुपयांना होते. ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहे.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, बल्लारपूर तालुका अध्यक्ष महादेव देवतळे, बल्लारपूर कार्यकारी अध्यक्ष राकेश सोमाणी, तसेच आरिफ शेख, भुरूभाई बक्ष, देव यादव, सुमित डोहने, नितीन सोयाम, अंकित निवलकर यांची उपस्थिती होती.