लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कारागृहातून बंदीवान सुटल्यानंतर त्याला रोजगार मिळावा या हेतूने बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीतर्फे बंदीवानांना बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून प्रशिक्षीत झालेल्या १७ पुरुष बंदीवान व १० महिला बंदी कारागृहात बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करीत आहे. कारागृहात प्रशासनाच्या वतीने व बीआरटीसीच्या वतीने बंदीवान रक्षाबंधनानिमीत्त बांबूपासून आकर्षक राख्या तयार करीत असून याचाच वापर करुन ते कारागृहात रक्षाबंधन साजरा करणार आहेत. तसेच दिवाळीसाठीसुद्धा आकाशकंदील बनविण्याच्या कामाला गती आली आहे.जिल्हा कारागृह येथे वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बांबू संशोधन व हस्तकला प्रशिक्षण केंद्र कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या परवानगीने बंदी बांधवांसाठी सुरु करण्यात आले. या माध्यमातून बंदीवानांना विविध प्रकारच्या कलाकुसराच्या वस्तू व हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण बंदीवानांना देण्यात आले. त्यामुळे कारागृहातील १७ पुरुष व १० महिला बंदीवान यामध्ये पारांगत झाले आहेत.नुकताच रक्षाबंधनाचा सण जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदीवान बांबूपासून आकर्षक अशा राख्या तयार करीत आहेत. याच राख्याचा वापर करुन ते बंदीवान कारागृहात रक्षाबंधनाचा सण साजरा करणार आहेत. तर दिवाळीमध्ये सर्वांच्या घरी मोठ्या प्रमाणात आकाशकंदीलांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे आकाशकंदीलला मोठी मागणी असते. म्हणूनच बंदीवान बांबूपासून आकाशकंदील तयार करण्याचे काम करीत आहेत.यासाठी बंदीबांधवांना कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या नेतृत्वात वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, देवाजी फलके, गौरव पाचाडे, रिंकू गौर, पद्माकर मेश्राम, लवकुश चव्हाण मदत करीत आहेत.रोजगारासाठी सक्षमबांबूपासून तयार होणाऱ्या हस्तकलेच्या विविध वस्तूपासून बंदीवानांना कारागृहात रोजगार प्राप्त झाला आहे. बंदीवान या कामात अत्यंत पारांगत झाल्यामुळे कारागृहातून शिक्षा भोगून सुटल्यानंतर बंदीवान स्वत: चा उदरनिर्वाह करण्यास सक्षम होणार आहेत. त्यामुळे बंदी पुनर्वसनाच्या दृष्टीने कारागृह प्रशासन व बीआरटीसीने उचललेले पाऊल अत्यंत प्रशंसनीय असल्याचे बोलले जात आहे.
बांबूनिर्मित राखीने बंदीवान साजरा करणार रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 9:56 PM
कारागृहातून बंदीवान सुटल्यानंतर त्याला रोजगार मिळावा या हेतूने बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीतर्फे बंदीवानांना बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून प्रशिक्षीत झालेल्या १७ पुरुष बंदीवान व १० महिला बंदी कारागृहात बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करीत आहे.
ठळक मुद्देआकाश दिवे साकारण्याच्या कामाला वेग : २७ बंदीवान प्रशिक्षित