चंद्रपूर : जिल्हा काँग्रेस कमिटी- पर्यावरण विभागाच्या वतीने खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते झाडांना इकोफ्रेंन्डली राखी बांधून केले वृक्षारोपण करुन रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्ष स्वाती धोटकर, माजी महापौर संगीता अमृतकर आदी उपस्थित होते. यावेळी खा. धानोरकर यांनी पर्यावरण विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली. तसेच श्रमसाफल्य काॅलनी स्नेहनगर येथील मोकड्या भूखंडाच्या विकासाकरिता सात लाखांचा निधी जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्षा स्वाती धोटकर यांनी औद्योगिक प्रकल्प निर्मितीमुळे होत असलेली वृक्षतोडीमुळे जैवविविधता टिकविण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, शहर अध्यक्ष रामू तिवारी, ओबीसी विभाग अध्यक्ष नरेंद्र बोबडे, इटकचे प्रशांत भारती, अनु. जाती शहर अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, गोपाल अमृतकर, प्रणिता बोरकर, वर्षा बोरकर, स्वाती बच्चुवार, सोनाली हेडाऊ, छाया बरडे, अभिलाषा मैदलकर आदी उपस्थित होते.
बॉक्स
मनपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बांधली वाहतूक पोलिसांना राखी
फोटो
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाहतूक पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी माजी महापौर अंजली घोटेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती चंद्रकला सोयाम, झोन एकच्या सभापती छबूताई वैरागडे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती पुष्पा उराडे यांच्यासह महिला नगरसेविका अनुराधा हजारे, कल्पना बगुलकर, माया उईके, शीतल गुरनुले, जयश्री जुमडे, आशा आबोजवार, वंदना तिखे, शीला चव्हाण, वंदना जांभूळकर, वनिता डुकरे, मंगला आखरे, मनपा समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, रोशनी तपासे आदी उपस्थित होते.