ही रॅली जटपुरा गेटपासून निघाली. बंद करो बंद करो, आदिवासींवर होणारे अन्याय, अत्याचार बंद करो, अशा घोषणा देत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. दरम्यान, भाषणांच्या माध्यमातून आदिवासी बांधवावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात आला. या जिल्हास्तरीय रॅली आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष विठोबा मधुकर येडमे, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे कार्यकारी सदस्य नितेश सिडाम, युवा नेता श्रीकृष्ण दडमल यांनी केले. या रॅलीत बहुजन क्रांती मोर्चा, भारतीय बेरोजगार, युवा विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, प्रोटॉन, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात विठोबा येडमे, नितेश सिडाम, प्रा. कविता चंदनखेडे, डाॅ गौतम नगराळे, रचना गेडाम यांचा समावेश होता.
आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चंद्रपूरात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:30 AM