लोकमत न्यूज नेटवर्कविहीरगाव : विहीरगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र हा दवाखाना मागील आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.विहीरगाव, कोहपरा, चनाखा, पंचाल आदी गावातील पशुपालकांसाठी विहीरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचाच आधार आहे. मात्र या दवाखान्यात पशु वैद्यकीय अधिकारी व परिचर नसतोे. त्यामुळे तो दवाखाना बंदच असते. पशुंचा दवाखानाच बंद राहत असल्याने शेतकरी व पशुपालकांची गैरसोय होत आहे. मागील आठ महिन्यांपासून हा दवाखाना बंद असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे व लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. मात्र कुणीही याकडे लक्ष दिले नाही. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एखादे जनावर आजारी असले तर त्याच्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांविना वेळेवर उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे जनावराचा अनेकवेळा जीव गेला आहे. सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरु होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना पशुधनाची गरज असते. मात्र पशु वैद्यकीय दवाखानाच बंद असल्यामुळे शेतकºयांची गैरसोय होत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी जनावारांना विविध आजाराने ग्रासले होते. तेव्हाही या दवाखान्याची पशुपालकांनी मदत झाली नाही.
विहीरगावमधील पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:22 PM