शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

रामदेगी-संघारामगिरीच्या निसर्गाची पर्यटकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:08 PM

रामायणात प्रभू श्रीराम व सीता मातेला १४ वर्षांचा वरवास झाला होता. या काळात प्रभू श्रीराम व सीता माता यांनी रामदेगी - संघारामगिरी जंगलात वास्तव्यास होते. असे जाणकार सांगतात. प्रभू राम व सीता मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामदेगी परिसरात निसर्गरम्य परिसर, चंदई नाला प्रकल्प, संघारामगिरीची टेकडी, धबधबा, पाण्याची सात कुंडे आहे. पावसाळ्यात हा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देचला पर्यटनाला : विदर्भातील पर्यटक व तरुणाईची विकेंडला गर्दी
<p>आशिष गजभिये।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : रामायणात प्रभू श्रीराम व सीता मातेला १४ वर्षांचा वरवास झाला होता. या काळात प्रभू श्रीराम व सीता माता यांनी रामदेगी - संघारामगिरी जंगलात वास्तव्यास होते. असे जाणकार सांगतात. प्रभू राम व सीता मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामदेगी परिसरात निसर्गरम्य परिसर, चंदई नाला प्रकल्प, संघारामगिरीची टेकडी, धबधबा, पाण्याची सात कुंडे आहे. पावसाळ्यात हा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.नैसर्गिक सौंदर्य, राम-सीतेचे वास्तव्य असलेला परिसर, रथाच्या चाकांचे निशाण व चंदई नाला प्रकल्प बघण्यासोबतच या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येतो. चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील गुजगवान गावावरून पूर्वेस ५ किमी अंतरावर असलेल्या रामदेगीला जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. या ठिकाणी मार्गशीष महिन्यात पाच सोमवारी यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक व पर्यटक या ठिकाणी येतात. रामदेगीचा इतिहास जुना आहे. रामदेगी हे ऋषिमुनींचे तपस्या करण्याचे ठिकाण होते.रामदेगीचा परिसर सण १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे.रामदेगी ला एक पुरातन काळातील देवस्थान आहे.हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेल आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे. यासोबतच परिसरात राम, लक्ष्मण , सीता बजरंगबली व विठ्ठल-रुक्मिनीची मंदिरे आहेत. मंदिराची स्थापना १९५८ ला झाली. टेकडीवरून बघितलं की हिरवाई ने नटलेला जंगलाचा परिसर, मंदिर, तलावाच चित्र बघून मनाला वेगळाच आनंद निर्माण होतो. जमनागडपासून उत्तरेला श्रीरामांच्या वास्तव्याची जागा आहे. या ठिकाणास भीमनचापरा मनून ओळखले जाते. त्या ठिकाणी श्रीराम विश्रांती घ्यायचे. मंदिरापासून भीमचापरा हा प्रवास पर्यटकांना अचंबित करणारा ठरते. पण आता काही दिवसांपासून वन विभागामार्फत वन्य प्राण्याचा वावर असल्याचे कारण देऊन प्रवेश नाकारला जात आहे. याच परिसरात टेकडीवरती वाघांच्या गुंफा बघावयास मिळतात. एका उंच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे. शिवमंदिर जवळच गायमुख आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस उंचावरून वाहत असलेले पाणी कुंडात सामाविष्ट होते. या धबधब्यावर सध्या विशेषत: तरुणाई आनंद घेताना दिसत आहे. याच रामदेगीला बौद्ध बांधव संघारामगिरी नावाने संबोधित करतात. पूर्वी सम्राट अशोकाचे राज्यकाळात भारत बौद्धमय होता. भिमानचापरा परिसरात बौद्धकालीन आसन आहे. याचा संबंध भगवान बुद्धांशी निगडित असल्याने या ठिकाणी बौद्ध भिख्खू नेहमी वास्तव्यास असतात. टेकडीवरती बौद्ध विहारे आहेत.आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत बौध्द भिक्खुचा वर्षावस या ठिकाणी चालतो.विदेशातील बौद्ध भिख्खू सुद्धा या ठिकाणी येत असतात.ताडोबा व्याघ्र प्रकल्पजवळच हे स्थळ येते. या ठिकाणी गेल्यानंतर हिरवळीने नटलेल्या टेकड्याचा परिसर बघून मन आनंदित होते. हे क्षेत्र वनपरिक्षेत्र खडसंगी (बफर) अंतर्गत असल्याने प्लास्टिक मुक्त आहे. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांच्या नोंदी वन नाकावरती करण्यात येतात. सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी असतात. अलीकडच्या काळात विदभार्तील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक शालेय सहलींचे प्रमाण जास्त दिसून येते. सुट्यांच्या काळात या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणी वाघ, बिबट, अस्वल, हरीण इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य दिसून येते.रामदेगी हा परिसर निसर्गरम्य असून पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असा आहे. या ठिकाणी असलेल्या धबधब्या वर भिजून आनंद घेतला. बौद्धविहाराचे दर्शन घेतले.- कृतिका शेंडे (पर्यटक), वर्धाया ठिकाणी मी पहिल्यांदाच आलोय. खूप सुंदर असा परिसर आहे. छान वाटले आज इकडे येऊन.- बंडू मेश्राम (पर्यटक),उमरेड, जि. नागपूर