शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रामनगरचा ‘तो’ पोलीस कर्मचारी होणार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:31 AM

चंद्रपूर : बाबू पेठ येथील अल्पवयीन मुलीने विवाहित व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली होती. ...

चंद्रपूर : बाबू पेठ येथील अल्पवयीन मुलीने विवाहित व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी त्या तक्रारीची गंभीरतेने दाखल घेतली नाही. पुढे संबंधित व्यक्तीने चाकू हल्ला केला. यात मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

बाबू पेठ येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची मंगळवारी सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून ठार करण्याची घटना जिल्ह्यासाठी धक्कादायक असून, मन हेलावणारी आहे. घरातील कमावत्या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे घरातील एका व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याचे आधीच आदेश देण्यात आले आहेत. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, आरोपी सुटता कामा नये यासाठी आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल हे सांगण्यासाठी आज भेट घेण्यात आल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी या वेळी दिली.

या वेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनी खोब्रागडे, माजी सभापती संतोष लहामगे, गोपाळ अमृतकर, कुणाल चहारे, राजेश अडूर, सचिन कत्याल, चंदा वैरागडे, राज यादव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.