लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुका परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रानडुकरांचा धानपिकांमध्ये वावर सुरू आहे. धान पीक गर्भाशयात असतापासूनच रानडुकरांचा त्रास होत असल्याने स्थानिक शेतकºयांनी जागल करून फटाके फोडून अख्खी रात्र काढत आहेत. आता धान कापणीला सुरुवात झाली असून कापणी केलेल्या धानपिकालाही रानटी डुकरे उद्ध्वस्त करीत असल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत.पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत परिसरातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसंरात्र पिकांचे रक्षण करीत आहेत. सध्याच्या हंगामात परिसरामध्ये धानपिकाच्या कापणीला जोमात सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून महागडी खते, औषधी वापरून पिकांच्या वाढीसाठी शेतकºयांनी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च केला. मात्र हातात आलेल्या पिकांवर आता रानटी डुकरांचा हैदोस सुरू झाल्याने या उपद्रवाला रोखण्यासाठी शेतकरी असमर्थ ठरत आहे.शेतशिवारातील झुडपी जंगलात वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र वन्यप्राण्यांची भिती असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता पिकांच्या संरक्षणासाठी जावे लागत आहे. या परिसरामध्ये रानटी डुकरांचा प्रताप भयानक वाढला असून ही निर्ढावलेली रानडुकरे पीक तुडवून शेताच्या धुºया पाºयांची सुद्धा नासधुस करतात. शेताभोवती तारेचे कुंपन केले असले तरीही त्याला न जुमानता शेतामध्ये मुसंडी मारतात. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट चाल करून शेतकºयांच्या अंगावर धावतात. अनेकदा शेतकरी जखमी झाल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. यामुळे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी येथील वनविभाग कार्यालयामध्ये नुकसान भरपाई मिळण्यासाठी विनंती अर्ज सादर करीत आहेत.त्यानुसार पोंभूर्णा येथील वनविभागाचे क्षेत्र सहायक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सहारे हे नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतामध्ये जावून धानपिकांची पाहणी करीत आहेत. यामध्ये वनविभागाकडून योग्य पंचनामा करून तोगडी मदत न देता नुकसानीच्या अनुषंगाने नुकसान जास्त आणि मदत अल्प अशी अवस्था न करता धानपिकांच्या सुरू असलेल्या भावनानुसार मदत देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. याची वनविभागाने दखल घेण्याची गरज असून अन्यथा शेतकºयांच्या रोषाला बळी पडावे लागणार आहे.उत्पादन कमी होण्याची शक्यतायेनबोडी : बल्लारपूर तालुक्यात पळसगाव, किन्ही, मानोरा, इटोली, कवडजई या क्षेत्रात खरीप हंगामात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ऐन धान निसवा होण्याच्या कालावधीत पिकावर करपा, मावा, तुडतुडा या रोगाने ग्रासल्याने अनेक शेतकºयांचे उभे धान पीक तणस झाले. हा रोग या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यामुळे अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हवालदिल झालेल्या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी व धान पिकावरील कर्ज माफ करावे, अशी शेतकºयांकडून मागणी होत आहे. यावर्षीच्या धान पिकाच्या निकषावरुन मागील वर्षीच्या तुलनेत धानाचे उत्पादन निम्याहून कमी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेवून कृषी विभागाने रब्बी पिकाकडे लक्ष वेधने गरजेचे आहे. चिंतातूर झालेल्या शेतकºयांना दिलासा देवून त्यांना रब्बी पिकासाठी मार्गदर्शन करून मोफत बियाणे पुरवठा करावा व शेतीबद्दल चिकाटी कायम ठेवण्यासाठी शेतकºयांच्या पेरणीपासून तर मळणीपर्यंत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
धानपिकांमध्ये रानडुकरांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:40 PM
तालुका परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रानडुकरांचा धानपिकांमध्ये वावर सुरू आहे.
ठळक मुद्देशेतकरी संकटात : वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी