शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रतनमुनीजी महाराजांचे चंद्रपुरात आगमन

By admin | Published: July 09, 2014 11:22 PM

प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी

चंद्रपूर : प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी मार्गे दररोज २५ ते ३० किमी पायदळ चालून बुधवारी चंद्रपुरात प्रवेश केला. त्यांचे आगमन होताच भाविकांनी जल्लोषात स्वागत केले.रतनमुनी महाराजांचा दीपककुमार तुषारकुमार डगली यांच्या निवासस्थानावरुन जैन भवन येथे प्रवेश झाला. यावेळी सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी जयघोष केला. यावेळी रायपूर, दुर्ग, भिलाई, मुंबई, वरोरा, वणी, देवरा, सिरसा, हिंगोली, गडचिरोली, बिजा येथून मोठ्या संख्येने भाविक आले. जनसमुदायाला गुरु महाराजांनीे प्रवचन केले. यावेळी गुरु महाराजांनी धर्म, तप, आराधना करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. मानवता हाच खरा धर्म असून हा प्रत्येक व्यक्तीकडून मानवता धर्माची जोपासना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना रतनमुनीजी यांनी व्यक्त केली. यापूर्वीच्या काळात मनुष्याला संत आणि सत्संगाचा सहवास लाभत असल्याने आदर्श समाज आणि व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी व्यसनमुक्त राहून धार्मिक व सामाजिक कार्यात वेळ देत असल्याने मनुष्याचे जीवन सर्वांग सुंदर होते, अलिकडे मात्र वैज्ञानिक प्रगतीमुळे मनुष्य स्वभावातही अमुलाग्र बदल होत असून मानवाला मानवता धर्माचा विसर पडू लागल्याची खंत रतनमुनी महाराज यांनी व्यक्त केली. मनुष्य जीवन हे क्षणभंगूर असल्याने मनुष्याने जीवनाचा अर्थ समजून इच्छा विरहीत जीवन जगून सत्कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. जो माणूस अहंकारी, मन, मत व जाती भेद करून मानवता धर्माला विसरू लागला आहे. त्या माणसाचा पुर्नजन्म होत नसतो, असे सांगताना माणसाने अहंकारी न राहण्याचा सल्ला दिला. बलशाली भारताच्या निर्मितीसाठी आदर्श व्यक्ती आणि समाजाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करताना रतनमुनी महाराज यांनी संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी निस्पृह, निस्वार्थी आणि निष्कलंक मनुष्याची गरज असून परमार्थासाठी संसाराचा त्याग करणारे संत मंडळी हे कार्य करीत असल्याचे गुरुमहाराजांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान, भोपालसिंगजी खडोड यांच्याकडून भोजन ठेवण्यात आले होते. यावेळी योगेश भंडारी, निर्दोष पुगलिया, सुभाष जैन, राज पुगलिया, रविंद्र बैद, दीपक डगली, पंकज बोथरा, नरेश तालेरा, जितेंद्र चोरडिया, तुषार डगली, दीपक पारख, पदम लोढा, किशोर गांधी, दिलीप बोहरा, प्रशांत बैद, अमित बैद, संदीप बाढीया, फेनबाबू भंडारी, सुहास साकले, सुधीर बाढीया, अशोक बोथरा, राहूल पुगलिया आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)