गरीबा तसेच गरजुंना राशन मिळावे यासाठी शासनाने गरजुंना शिधापत्रिका दिली आहे. यासाठी लाभार्थ्यांची विभागणी करण्यात आली आहे. विभागणीनुसार लाभार्थ्यांना अन्नधान्य तसेच इतर सुविधा मिळतात. मात्र अनेकवेळा लाभार्थी एका गावातून दुसऱ्या किंवा अन्य राज्यतही जातो. अशावेळी त्याचे हाल होऊ नये, त्यांच्या हक्काचे धान्य, शिधापत्रिकेची अद्यावत माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन रेशनकार्ड योजना सुरु केली. या माध्यमातून कुठलाही व्यक्ती कोणत्याही ठिकाणाहून लाभ घेऊ शकणार आहे. दरम्यान, लाभार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी आता मेरा रेशन हा मोबाईल ॲपही विकसित केला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्येकबाबीची माहिती होणार आहे.
बाॅक्स
या मिळणार सुविधा
लाभार्थ्यांना मिळणारे धान्य
जवळपास असलेले रास्त भाव दुकाने
शिधापत्रिकेवर उचल झालेल्या धान्याची माहिती
शिधापत्रिका पात्र आहे की अपात्र
आधार अद्यावतबाबत माहिती
बाॅक्स
लाभार्थी करू करणार तक्रार
मेरा रेशन ॲपवर लाभार्थ्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत रास्त भाव दुकानातून त्याला त्रास होत असेल, धान्य मिळत नसेल किंवा अन्य माहितीसाठी लाभार्थी आपली तक्रार तसेच अभिप्राय यावर नोंदवू शकणार आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील लाभार्थीअंत्योदय १,३७,१८७
प्राधान्य कुटुंब २,६१,०८४
हेल्पलाईन क्रमांक १४४४५
कोट
रेशन कार्डवर मिळणारे धान्य, जवळपास असलेले स्वस्त धान्य दुकान आदींची माहिती मिळण्याकरिता केंद्र सरकारने मेरा रेशन ॲप विकसित केले आहे. गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून आपल्या शिधाकार्डवरील अद्यावत माहिती जाणून घ्यावी. यामुळे लाभार्थ्यांना दुकानात किंवा शासकीय कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.
-भारत तुंबडे
अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी, चंद्रपूर