चंद्रपूर शहरातून नागपूर, पुणे, औरंगाबाद, गडचिरोली, चिमूर मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स धावतात. कोरोनाच्या आधी दररोज ९० ते १०० ट्रॅव्हल्स धावत होत्या. मात्र, लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय अडचणीत आला होता. दरम्यान, काही महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने पुन्हा ट्रॅव्हल्स धावू लागल्या होत्या. प्रवाशांची संख्या वाढत असतानाच पुन्हा सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आपोआपच घटली. परिणामी ट्रॅव्हल्सच बंद पडल्या. तसेच पुणे, औरंगाबाद येथेही अशीच अवस्था असल्याने याही ट्रॅव्हल्स अत्यंत कमी प्रमाणात धावत आहेत. केवळ चिमूर व गडचिरोली मार्गावरच ट्रॅव्हल्स धावत आहेत; परंतु या मार्गावरीलसुद्धा प्रवाशांची संख्या पुन्हा घटली आहे.
-------
बॉक्स
गाडी रुळावर होती......
कोरोनापूर्वी ट्रॅव्हल्स व्यवसायाची परिस्थिती चांगली होती. चंद्रपूर जिल्ह्यातून दररोज १०० च्या जवळपास ट्रॅव्हल्स धावत होत्या. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. परिणामी ट्रॅव्हल्स व्यावसायिक, तिकीट बुक करणारे, चालक-वाहक यांच्यावर आर्थिक संकट आले आहे.
कोट
लॉकडाऊनंतर ट्रॅव्हल्स धावायला लागल्या; परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने अर्ध्यापेक्षा अधिक ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या बंद आहेत. परिवहन विभागाने कर कमी केले; परंतु टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या वाहनावर मोठ्या प्रमाणात कर आकारले जात असल्याने ते भरणेसुद्धा अडचणींचे झाले आहे. सहा महिने कर्जाचे हप्ते घेऊ नये असे प्रशासनाने कंपनी किंवा बॅंक प्रशासनाला निर्देश दिले; परंतु त्यावरील व्याज वाढतच गेले. त्यामुळे एक-दोन ट्रॅव्हल्स असणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, त्याचे हप्ते थकले आहे.
-निखिल बोहरा, ट्रॅव्हल्स संचालक
कोट
पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे जाण्यासाठी प्रवासी तयार नाहीत. त्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक ट्रॅव्हल्स बंदच आहेत. ज्या ट्रॅव्हल्स धावत आहेत, त्यामध्ये केवळ दहा ते १२ प्रवासी राहत असल्याने साधा टोल टॅक्स निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कुठून करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनिल त्रवेदी, ट्रॅव्हल्स संचालक, चंद्रपूर