लोकमत न्यूज नेटवर्कमूल : दैनिक लोकमत हे वृत्तपत्र वाचकांच्या मनामनात घर केलेले आहे. सकाळी लोकमताचा अंक रोज हातात घेतल्याशिवाय मन लागत नाही. नवनव्या बातम्यांचा खजिनाच दैनिक लोकमतमध्ये राहतो, मूल तालुक्यातील विविध व वाचनीय माहिती ‘समृद्ध वाटचाल’ या पुरवणीच्या माध्यमातून प्रकाशित केलेली असून सदर पुरवणी स्मार्ट सिटीतील वाचनीय पुरवणी असल्याचे प्रतिपादन मूलचे तहसीलदार राजेश सरवदे यांनी व्यक्त केले.लोकमतच्या समृद्ध वाटचाल पुरवणीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या प्रकाशन सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबडे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, शहर प्रतिनिधी भोजराज गोवर्धन, भेजगावचे वार्ताहर शशिकांत गणवीर, सुशी दांबगावचे वार्ताहर दुर्योधन घोंगडे आदी उपस्थित होते.नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मागील चार ते पाच वर्षात मूल शहर व तालुक्याचा मोठया झपाट्याने विकास होत आहे, अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी काम करता यावे, यासाठी प्रशासकीय इमारतीचे काम पूर्णत्वास येत असून पंचायत समितीच्या इमारतीच्या कामालाही सुरूवात होत आहे. हे संपूर्ण वास्तव दैनिक ‘लोकमत’च्या ‘समृद्ध वाटचाल’ पुरवणीत प्रकाशित केले आहे. यामुळे या पुरवणीचा नागरिकांना नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे यांनी केले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी प्रदिप पांढरवडे, मूलचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनीही समृद्ध वाटचाल पुरवणीचे कौतुक केले.प्रास्ताविक राजू गेडाम, संचालन भोजराज गोवर्धन तर आभार शशिकांत गणवीर यांनी मानले.
स्मार्ट सिटीतील वाचनीय पुरवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:19 PM
दैनिक लोकमत हे वृत्तपत्र वाचकांच्या मनामनात घर केलेले आहे. सकाळी लोकमताचा अंक रोज हातात घेतल्याशिवाय मन लागत नाही. नवनव्या बातम्यांचा खजिनाच दैनिक लोकमतमध्ये राहतो, मूल तालुक्यातील विविध व वाचनीय माहिती ‘समृद्ध वाटचाल’ या पुरवणीच्या माध्यमातून प्रकाशित केलेली असून सदर पुरवणी स्मार्ट सिटीतील वाचनीय पुरवणी असल्याचे प्रतिपादन मूलचे तहसीलदार राजेश सरवदे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देसरवदे : लोकमतच्या ‘समद्ध वाटचाल’ पुरवणीचे प्रकाशन