लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: तांदळाच्या ९ वाणांचे जनक असलेले दादाजी खोब्रागडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज बुधवारी सकाळी भा.रा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे येत असून त्यांच्या स्वागतासाठी नांदेडचे गावकरी सज्ज झाले आहेत. दिल्लीच्या एसपीजी कार्यालयातील अधिकारी या सज्जतेवर लक्ष ठेवून आहेत.या ठिकाणी एक हेलिपॅड तयार केले असून त्याची चाचणीही काल घेण्यात आली. आज सकाळपासूनच येथे काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, प्रसिद्धी माध्यमे यांची मांदियाळी जमली आहे. हेलिपॅडपासून दादाजी खोब्रागडे यांच्या घरापर्यंतच्या प्रवासाची ट्रायल सकाळी घेण्यात आली. अ.भा. काँग्रेस समितीच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर या नांदेडमध्ये दाखल झाल्या आहेत. दादाजी खोब्रागडे यांचे चिरंजीव मित्रजीत राहुल गांधी यांच्यासमोर विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड गाव राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:26 AM
तांदळाच्या ९ वाणांचे जनक असलेले दादाजी खोब्रागडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज बुधवारी सकाळी भा.रा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे येत असून त्यांच्या स्वागतासाठी नांदेडचे गावकरी सज्ज झाले आहेत.
ठळक मुद्देगावाला आले छावणीचे स्वरुपयशोमती ठाकूर गावात दाखल