चंद्रपूर : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बळीराजाला बळकट करण्याकरिता गट ग्रामपंचायत नागाळा येथे शेतकऱ्यांना मोफत रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला.
मागील वर्षापासून देशात कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे सर्वजण आर्थिक संकटात आहेत. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहेत. त्याना मदत करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांना मोफत खतपुरवठा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, सरपंच रंजना कांबळे, उपसरपंच सज्जन सातपुते, आतिश चिमूरकर, विकास विरुटकर, राहुल विरुटकर, विक्रांत सहारे, विनय धोबे, गणेश सिंग ठाकूर, अशोक चिलखरे, सूरज घोंगे, बाळू भगत, सुमित अग्रवाल, वसीम खान, सिकंदर खान, सद्दाम शेख, सचिन मिश्रा, करण वैरागडे, वैभव काळे आदी उपस्थित होते.